विमल रानडे यांचे निधन

By Admin | Updated: November 13, 2016 23:05 IST2016-11-13T23:05:29+5:302016-11-13T23:05:29+5:30

गोवा मुक्ती लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांच्या पत्नी विमल रानडे यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री पुणे येथे इस्पितळात निधन झाले.

Vimal Ranade passed away | विमल रानडे यांचे निधन

विमल रानडे यांचे निधन

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 13 - गोवा मुक्ती लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांच्या पत्नी विमल रानडे यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री पुणे येथे इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 होते.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह गोव्यातील अनेक मान्यवरांनी विमल रानडे यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. विमल रानडे सामाजिक कार्यात सक्रिय असायच्या. समाजाच्या उपेक्षित घटकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Vimal Ranade passed away