मडगावजवळ गावामध्ये दिवसा शिरलेला बिबटया
By Admin | Updated: March 17, 2017 19:36 IST2017-03-17T19:36:08+5:302017-03-17T19:36:08+5:30
चार किलोमीटरवरील दवर्ली गावात भर वस्तीत शुक्रवारी दुपारी बिबटा शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

मडगावजवळ गावामध्ये दिवसा शिरलेला बिबटया
ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. 17 - येथून चार किलोमीटरवरील दवर्ली गावात भर वस्तीत शुक्रवारी दुपारी बिबटा शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. तब्बल तीन तास या बिबट्याने या वस्तीत मुक्काम ठोकला होता. शेवटी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुध्द करून हलविल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मडगावच्या आके-पॉवरहाउसपासून केवळ अर्धा किलोमीटवरील राजेश खरंगटे यांच्या घराशेजारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा बिबटया दिसला. खरंगटे यांच्या चारचाकीच्या खाली तो बसला होता. यासंबंधी त्वरित वन खात्याला कळविल्यानंतर मडगाव, पणजी व बोंडला येथील पथके घटनास्थळी दाखल झाली.बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन डार्टद्वारे मारले. त्यानंतर बेशुध्द बिबट्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हलविले.