शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

माणूस म्हणून कसे होते मनोहर पर्रीकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 10:49 IST

दोघे मित्र.... दोघांच्या वाटा वेगळ्या, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर. पण मैत्र हा दोघांना एकत्र आणणारा समान धागा. अर्थात हे आहेत दिलीप करंबेळकर आणि मनोहर पर्रीकर. दोघांच्या खूप वर्षांच्या मैत्रीबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी....

(मनोहर पर्रीकरांच्या साठीनिमित्त लिहिण्यात आलेला विशेष लेख)

आणीबाणी संपल्यानंतर माझी गोव्यामध्ये जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. गोव्यातील काम करणारे कार्यकर्ते तरुण, उत्साही होते. तिथल्या कामात अधिक मोकळेपणा होता. गोव्याचा एकूण स्वभाव आतिथ्यशील आहे. माझ्यापूर्वी दुर्गानंद नाडकर्णी हे प्रचारक होते आणि कोणत्याही कुटुंबाचा सहजपणे घटक बनणे हा त्यांचा सहज स्वभावाचा भाग होता. अशाच प्रकारे म्हापशाचे पर्रीकर यांचे घर संघाशी जोडले गेलेले होते. मी गोव्यात प्रचारक असताना मनोहर मुंबईत आय.आय.टी.मध्ये शिकत होता. परंतु त्याचा मोठा भाऊ अवधूत हाही संघाचा चांगला कार्यकर्ता होता. त्यामुळे स्वभाविकच म्हापशात गेल्यावर पर्रीकरांच्या घरी जाणे व्हायचे.मी प्रचारक म्हणून १९८० साली थांबता थांबता मनोहर गोव्यात आला आणि गोव्यातच व्यवसाय सुरू करण्याचे त्याने निश्चित केले. आज आश्चर्य वाटते, पण त्या काळात माझा व मनोहरचा परिचय वरवरचा राहिला, कारण त्या काळात आम्ही फारसे एकत्र नव्हतो.प्रचारक म्हणून थांबल्यानंतर प्रचारकाने आपल्या पूर्वीच्या कार्यक्षेत्रात रस घेऊ नये, असा संघाचा अलिखित संकेत आहे. नव्या प्रचारकाला जुन्या प्रचारकाच्या संबंधाचा त्रास होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु तिथे प्रचारक आले. मिलिंद करमरकर आणि गोव्यातील सगळा सहकारी कार्यकर्ता यांच्यात एवढे खेळीमेळीचे आणि मोकळे वातावरण होते, की गोव्यातून मुंबईला आल्यानंतरही माझा गोव्याशी संपर्क सुरू राहिला. त्या काळात मनोहर संघचालक होता. बहुतेक तो सर्वात कमी वयाचा संघचालक असावा.भारतात १९५१ नंतर जनसंघाचे काम सुरू झाले आणि ते क्रमाक्रमाने वाढत गेले. परंतु गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा हिंदूंचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे गोव्यात जनसंघाची आणि नंतर भारतीय जनता पक्षाची फारशी वाढ झाली नाही. परंतु १९८४ नंतर भाजपचे काम गोव्यात वाढण्यासाठी मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईक या दोघांना संघचालक पदावरून मुक्त करून भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सांगण्यात आले. या दरम्यान संघ, राजकारण आणि वाचन यामुळे मनोहरची माझी मैत्री वाढत गेली. मनोहरकडे बुद्धिमत्ता आहे. काम करण्याची प्रचंड उर्मी, वैचारिक झेप त्याच्याकडे आहे. परंतु यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक विलक्षण पारदर्शकता आहे.मनोहरला जे वरवर ओळखतात, त्यांना माझ्या या वाक्याचे आश्चर्य वाटेल. राजकीय डावपेचात मनोहर तज्ज्ञ असल्यामुळे जे लोक त्याच्या भूमिकेऐवजी डावपेचाकडे पाहात असतात त्यांना मनोहरने घेतलेले निर्णय आकस्मिक व गोंधळात पाडणारे वाटत असतात. परंतु हे निर्णय घेत असताना आपल्या पक्षाचा प्रभाव कसा वाढेल, याच्या विचाराचा आराखडा त्याच्याकडे तयार असतो. त्यात निर्माण होणाऱ्या शक्यतांचा विचार त्याने केलेला असतो आणि कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा याचेही त्याचे गणित मनात तयार झालेले असते. त्यामुळे तश्ी परिस्थिती निर्माण झाल्यास तो पटकन त्या निर्णयास येतो. त्याच्या भोवतीच्या सहकाऱ्यांना मात्र गोंधळल्यासारखे वाटते, त्यामुळे मनोहरला जाणून घ्यायचे असेल तर त्याला व्यक्ती म्हणून जाणून घेता आले पाहिजे. त्याच्या मनात सातत्याने पक्षवाढीचा विचार चालू असतो, तो जाणता आला तर मनोहरच्या वागण्यातले गूढ उलगडू शकते, असे मला वाटते आणि कदाचित तोच आमच्या मैत्रीचा एकमेकांना बांधून ठेवणारा धागा असावा.मनोहर आणि श्रीपाद नाईक यांनी भाजपची सूत्रे हाती घेतली तेव्हा गोव्यातले भाजपचे काम अगदी नगण्य होते. श्रीपाद हा लोकांच्या भावनिक सबंधांना महत्त्व देणारा, तर मनोहर हा ‘टास्क मास्टर.’ अवघ्या दहा-बारा वर्षांत भाजपाने गोव्यात सत्तेची सूत्रे हाती घेतली. यामागे मनोहरच्या परिश्रमाचा, संघटनकौशल्याचा आणि डावपेचांचा मोठा वाटा होता. सत्तेवर आल्यानंतर मनोहरने गोव्याच्या विकासात अक्षरश: स्वत:ला झोकून दिले. गोवा स्वतंत्र झाल्यापासून जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढी त्याच्या काळात झाली. त्याची विकासाची संकल्पना केवळ वीज, पाणी, रस्ते एवढीच नव्हे तर मानवी विकासाचा आशयही त्यात होता. त्यामुळे वृद्धांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध योजना त्याने राबविल्या. शाळांच्या अनुदानात वाढ केली. सर्व विद्यार्थ्यांना संगणक देण्याचा निर्णय ऐतिहासिकच होता. विद्यार्थ्यांना संगणक देणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य आणि या सर्व योजनांच्या मागे मनोहरचे डोके होते. त्याने मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अनेक गोष्टी सांगता येतील. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बुद्धीमान, कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमा असलेला मुख्यमंत्री म्हणून त्याला अ‍ोळखले गेलेच, पण महत्त्वाचे म्हणजे त्या सहजतने आणि साधेपणाने तो त्या काळात राहिला. अनेक मंत्री, मुख्यमंत्री आपल्या कार्यकाळात पंचतारांकीत हॉटेलात शासकीय खर्चाने राहतात. मनोहर शासकीय निवासस्थान किंवा कोणाही मित्राच्या घरी नि:संकोचपणे, सहजपणे राहतो. हे मित्र कोणी ‘पंचतारांकीत’ मित्र नाहीत, तर संघाचे, पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहेत.त्याच्या वागण्यातील सहजता आणि साधेपणा हे आमच्या मैत्रीतील दुसरे कारण असावे. आम्ही त्या काळात एकमेकांशी खूप चर्चा केली असे नाही, परंतु अनेकवेळा असे लक्षात येते की, फारशी चर्चा न करता किंवा एकमेकांशी विचारविनिमय न करता अनेकदा आमचे मत एकसारखे असते आणि त्यामुळे आम्हा दोघांनाही एखादी गोष्ट समजून सांगण्यात फारसे शब्द खर्ची करावे लागत नाहीत. आपल्या विरोधकांनी आपल्यावर टीका करत राहणे याचा मनाला फारसा त्रास होत नाही, परंतु आपले लोकच जेव्हा गैरसमज करून घेतात, तेव्हा त्यातून होणारा मनाचा कोंडमारा विलक्षण असतो. परंतु त्याच्या पत्नीच्या मेधाच्या आजारपणात आणि जेव्हा गैरसमजातून निर्माण झालेल्या अंतर्गत संघर्षात त्याच्या डोळ्यांतून आलेले अश्रू मी पाहिलेले आहेत. मेधा आणि मनोहर यांचा प्रेमविवाह होता. मनोहरच्या वागण्यात मऊपणा, मृदुता याचा अभाव आणि मेधाचे वागणे हेही त्याला अपवाद नव्हते.आयुष्यात काही गोष्टी कधी न विसरणाºया असतात. मेधाला ब्लड कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांकडून पक्के निदान करण्यात आले. त्यानंतर हे सगळे फोनवरून मला सांगत असताना मनोहरच्या आवाजातला कातरपणा आजही स्पष्टपणे कानाला जाणवतो. पण त्या वाक्यांनी मनोहर सावरला. आपल्या नेहमीच्या व्यावसायिक कार्यक्षमतेने रुग्णालयात प्रवेश घेणे आणि नंतरच्या उपचारांची व्यवस्था करण्याच्या मागे लागला. त्या उपचाराचा मेधावर काही उपयोग न होता ती त्याच्या जीवनातून निघून गेली. परंतु तिने मनोहरच्या जगण्याला आंतरिक बळ दिले आहे. त्याचे सामर्थ्य सहजपणे सांगता येणे अवघड आहे. राजकीय नेते सहजपणे ज्याा विचारांना बळी पडतात, त्यापासून मेधाने मनोहरला वाचविले आहे, अशी मनोहरची धारणा असावी, असे मला वाटते. या गोष्टी व्यक्त करणे शक्य असूनही त्या शब्दाविणा जाणून घ्याव्या लागतात.राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची विश्वासार्हता आज नष्ट झाली आहे, त्यामुळे राजकारणात राहण्याकरता, टिकण्याकरता मनोहरने डावपेच वापरले, त्या सर्वांचे मला वाटते, त्यापेक्षा वेगळे विश्लेषण करता येणे शक्य आहे. परंतु त्याच्या अंतर्मनात वाहणारा लोकहिताचा आणि संघसंस्काराचा अंत:प्रवाह एवढा शुद्ध आणि प्रवाही आहे, की त्यानेच मनोहरला त्याच्या राजकीय कोशातून योग्य मार्गावर ठेवले आहे. आज अखिल भारतीय राजकारणात मनोहरबद्दल चर्चा सुरू झाली. तो अखिल भारतीय राजकारणात जाईल की नाही? गेला तर यशस्वी होईल की नाही यासंबंधी वेगवेगळी मतं आहेत. परंतु एखादी व्यक्ती अशा गणितात न बसणारी असते, यावर लोकांचा विश्वास नसतो. त्यामुळे मनोहरची दिल्लीतच काय, पण कुठेच लॉबी नाही. त्याचा गट नाही, त्याचे आवडते किंवा नावडते लोक नाहीत. त्याची विवेकबुद्धी, लोकहितवादी बुद्धी आणि संघाकडून घेतलेले संस्कार हेच त्याचे प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत. आणि जोपर्यंत हे त्याच्यापाशी आहेत तोपर्यंत तो गोव्यात राहिला काय अन् दिल्लीत राहिला काय... ही चर्चा अर्थशून्य आहे, असे मला वाटते आणि बहुधा त्यालाही तेच वाटत असावे.(‘समदा’च्या दिवाळी २00९ मधील मैत्र विशेषांकातून साभार)

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर