शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

वास्कोत रेल्वे सेवा कोलमडली

By admin | Updated: July 10, 2014 01:26 IST

वास्को : नैऋत्य रेल्वे विभागाच्या वास्को रेल्वे स्थानकाजवळच्या दोन रुळाअंतर्गत असलेल्या कॉँक्रिटच्या सुमारे ५० मीटर लोहमार्गावरील संरक्षक भिंत बुधवारी सकाळपासून पडत

वास्को : नैऋत्य रेल्वे विभागाच्या वास्को रेल्वे स्थानकाजवळच्या दोन रुळाअंतर्गत असलेल्या कॉँक्रिटच्या सुमारे ५० मीटर लोहमार्गावरील संरक्षक भिंत बुधवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळावर कोसळली. लोहमार्ग खचल्याने बुधवारी दुपारी १२७९९ वास्को-हजरत निझामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी सुमारे सहा तासांनी, तर १२७४१ अप वास्को-पटना ही गाडी सुमारे तीन तासांनी उशिरा सोडण्यात आली. तर दुपारी हावडा-वास्को अमरावती एक्स्प्रेस गाडी मडगाव स्थानकावर सुमारे आठ तास अडवून ठेवली. वास्को-कुळे आणि कुळे-वास्को या पॅसेंजर गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारात घडली. वास्को स्थानकावरील गाड्या यार्डातून स्थानकात आणण्यासाठी त्या मायमोळे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीपर्यंत नेण्यात येतात. त्या ठिकाणी दोन लोहमार्ग आहेत. एक लोहमार्ग हा सर्व रेल्वेसाठी मुख्य मार्ग असून, त्याच्या बाजूच्या दुसऱ्या लोहमार्गाचा वापर यार्डातून असलेली गाडी रेल्वे स्थानकात नेण्यासाठी करण्यात येतो. मुख्य लोहमार्ग थोडा उंचीवर आणि दुसरा लोहमार्ग सखल भागात असल्याने या दोन्ही लोहमार्गादरम्यान मधोमध संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजता वास्को-निझामउद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी यार्डातून स्थानकात आणण्यासाठी या लोहमार्गावर आणली असता कॉँक्रिटची संरक्षक भिंत कमकुवत होऊन त्या भागाला खिंडार पडले. त्यामुळे वास्को-हजरत निझामुद्दीन गाडीचे डबे या लोहमार्गावर अडकून पडले. सुदैवाने गाडीचे डबे खाली कोसळले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेमुळे वास्को-निझामुद्दीन आणि वास्को-पटना या गाड्यांचे डबे यार्डातून रेल्वे स्थानकांवर आणता आले नाहीत. तसेच या मार्गावरील जमीन खचल्याने मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या अडून पडल्या. (प्रतिनिधी)