वास्कोत रेल्वे सेवा कोलमडली

By Admin | Updated: July 10, 2014 01:26 IST2014-07-10T01:26:18+5:302014-07-10T01:26:42+5:30

वास्को : नैऋत्य रेल्वे विभागाच्या वास्को रेल्वे स्थानकाजवळच्या दोन रुळाअंतर्गत असलेल्या कॉँक्रिटच्या सुमारे ५० मीटर लोहमार्गावरील संरक्षक भिंत बुधवारी सकाळपासून पडत

The Vascoit rail service collapsed | वास्कोत रेल्वे सेवा कोलमडली

वास्कोत रेल्वे सेवा कोलमडली

वास्को : नैऋत्य रेल्वे विभागाच्या वास्को रेल्वे स्थानकाजवळच्या दोन रुळाअंतर्गत असलेल्या कॉँक्रिटच्या सुमारे ५० मीटर लोहमार्गावरील संरक्षक भिंत बुधवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळावर कोसळली. लोहमार्ग खचल्याने बुधवारी दुपारी १२७९९ वास्को-हजरत निझामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी सुमारे सहा तासांनी, तर १२७४१ अप वास्को-पटना ही गाडी सुमारे तीन तासांनी उशिरा सोडण्यात आली. तर दुपारी हावडा-वास्को अमरावती एक्स्प्रेस गाडी मडगाव स्थानकावर सुमारे आठ तास अडवून ठेवली. वास्को-कुळे आणि कुळे-वास्को या पॅसेंजर गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या.
ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारात घडली. वास्को स्थानकावरील गाड्या यार्डातून स्थानकात आणण्यासाठी त्या मायमोळे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीपर्यंत नेण्यात येतात. त्या ठिकाणी दोन लोहमार्ग आहेत. एक लोहमार्ग हा सर्व रेल्वेसाठी मुख्य मार्ग असून, त्याच्या बाजूच्या दुसऱ्या लोहमार्गाचा वापर यार्डातून असलेली गाडी रेल्वे स्थानकात नेण्यासाठी करण्यात येतो. मुख्य लोहमार्ग थोडा उंचीवर आणि दुसरा लोहमार्ग सखल भागात असल्याने या दोन्ही लोहमार्गादरम्यान मधोमध संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजता वास्को-निझामउद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी यार्डातून स्थानकात आणण्यासाठी या लोहमार्गावर आणली असता कॉँक्रिटची संरक्षक भिंत कमकुवत होऊन त्या भागाला खिंडार पडले. त्यामुळे वास्को-हजरत निझामुद्दीन गाडीचे डबे या लोहमार्गावर अडकून पडले. सुदैवाने गाडीचे डबे खाली कोसळले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेमुळे वास्को-निझामुद्दीन आणि वास्को-पटना या गाड्यांचे डबे यार्डातून रेल्वे स्थानकांवर आणता आले नाहीत. तसेच या मार्गावरील जमीन खचल्याने मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या अडून पडल्या.
(प्रतिनिधी)

Web Title: The Vascoit rail service collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.