वास्को बलात्कार प्रकरण ‘फाईल बंद’?
By Admin | Updated: May 6, 2015 02:29 IST2015-05-06T02:29:32+5:302015-05-06T02:29:45+5:30
वास्को बलात्कार प्रकरण ‘फाईल बंद’?

वास्को बलात्कार प्रकरण ‘फाईल बंद’?
वासुदेव पागी ल्ल पणजी
वास्कोतील एका नामांकित विद्यालयातील बालिकेवरील बलात्कार प्रकरण ‘फाईल बंद’च्या दिशेने सरकत आहे. सीबीआयकडून दीड वर्षांत केवळ दोन रेखाचित्रे काढण्याव्यतिरिक्त तपास शून्य आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा छडा लागण्याच्या शक्यता अंधुक झाल्यामुळे प्रकरण बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत.
१४ जानेवारी २०१३ रोजी वास्को येथील एका नामांकित प्राथमिक विद्यालयात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाचा तपास गेल्या दीड वर्षात एक इंचही पुढे सरकला नाही. दीड महिन्यात सीबीआयने संशयिताची दोन रेखाचित्रे बनविण्याचे काम केले. त्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.
या विषयी सीबीआयचे अधीक्षक ए. कुमार यांना विचारले असता, त्यांनी तपासाविषयी माहिती देण्यास नकार दिला; परंतु या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे का, असे विचारले असता, ‘ते आताच काही सांगता येणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. सीबीआयच्या विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
(पान ७ वर)