शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

गोव्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत विविध उपक्रम,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 9:21 PM

गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील.

पणजी - गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील.  या अभियानांतर्गत स्वच्छ भारत मोहीम, प्रधानमंत्री उजाला योजना, किसन कल्याण योजना, मिशन इंद्रधनुष्य, उज्ज्वल योजना आदी योजनांची जागृती करण्यात येणार आहे. पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सलोखा वृध्दिंगत व्हावा तसेच ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांपर्यंत पोचून सरकारच्या योजनांबद्दल त्यांचा प्रतिसाद घेणे, स्वच्छता, पंचायती राज संस्था बळकट करणे आदी विषय हाताळले जातील. २४ एप्रिल रोजी पंचायती राज दिन साजरा केला जाईल. या दिवशी दुपारी बाल ग्रामसभा घेण्यात येतील. लहान मुलांशी संवाद साधला जाईल. पंचायत क्षेत्रांमध्ये प्रदर्शने भरवून चांगल्या प्रशासनाबाबत जागृती केली जाईल. काही यशोगाथाही उपस्थितांसमोर ठेवल्या जातील. सर्व स्तरातील लोक या अभियानात सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. खास करुन महिला, स्वयंसाहाय्य गट यांनाही सहभागी केले जाईल. पंचायतींनी लोकसहभागातून प्रभावी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचायती राजच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी पाच वर्षांकरिता रोड मॅप तयार करावा, असे पंचायतींना सूचविण्यात आले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाणी निचरा आदी विषय विशेष ग्रामसभांमध्ये चर्चेचा घेतले जाणार आहेत. ग्रामसभांमध्ये चर्चेसाठी ‘स्वप्नातलें गोंय’ ही संकल्पना असावी, असेही सूचविण्यात आले आहे. खुल्या जागांचे सौंदर्यीकरण यालाही महत्त्व देण्यात आले आहे. पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यासाठी १0 हजार रुपये अनुदान देण्याची सूचना खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केली आहे.  

टॅग्स :goaगोवाgram panchayatग्राम पंचायत