पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत; जॉन लोबो यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:11 IST2021-02-20T23:11:32+5:302021-02-20T23:11:55+5:30
लोबो यांचा स्वतःचा पीटी बॉईज, कळंगुट हा चित्ररथ पणजी आणि मडगावला चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत; जॉन लोबो यांचे आवाहन
अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे उपाध्यक्ष जॉन लोबो म्हणाले की, कार्निवल आणि व्हॅलेंटाईन डे केवळ एका दिवसाच्या फरकाने आला हा खरा दुग्धशर्करा योग होता. त्यामुळे पर्यटकांची संख्या गेल्या आठवड्यात वाढली परंतु नंतर काही प्रमाणात ती कमी झालेली दिसून येते. कार्निवलला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत.
लोबो यांचा स्वतःचा पीटी बॉईज, कळंगुट हा चित्ररथ पणजी आणि मडगावला चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता. पणजीत लोबो यांच्या या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. ते म्हणाले की आता व्यावसायिकांनी स्वतः पुढाकार घेऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे विविध उपक्रम राबवावे लागतील. पीटी बॉईज संघाला दुसरे पारितोषिक मिळाल्याने लोबो यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारनेही अधिकाधिक पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अखिल गोवा शॅकमालक संघटनाही त्यादृष्टीने प्रयत्नरत आहे.