वैभव राजामणीची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
By समीर नाईक | Updated: December 18, 2023 18:22 IST2023-12-18T18:22:23+5:302023-12-18T18:22:32+5:30
पर्वरी येथील वैभव राजामणी यांनी सायकल चालवत वर्ल्ड रेकॉर्ड केला.

वैभव राजामणीची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
पणजी : पर्वरी येथील वैभव राजामणी यांनी सायकल चालवत वर्ल्ड रेकॉर्ड केला. राजमणी याने १८ डिसेंबर रोजी ७ तास १८ मिनिटे १३ सेकंदात १५१.३ किमी अंतर कापून हँडल बारला स्पर्श न करता सायकलिंग करत नवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. या उपलब्धीमुळे राज्याचे नाव उज्वल झाले आहे.
वैभव राजामणी यांनी १७ डिसेंबर रोजी, सायंकाळी ५:३२ वाजता सुकुर येथील स्केटिंग रिंग येथे दोन हात सोडून सायकल चालवण्यास सुरु केली होती. तर १८ डिसेंबर रोजी पहाटे १२.५० वाजता १५१.३ कि.मी चालवून पूर्ण केले. यावेळी अनेकांनी राजामणी यांना हा खास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत केली. उपस्थित अनेकांनी आपल्यापरीने पैसे देऊन त्यांच्या या पराक्रमाचे समर्थन केले.
वैभव राजमणी हे राज्यातील प्रसिध्द कलाकार सुबोध केरकर यांचे व्हिडिओ संपादक आणि छायाचित्रकार म्हणून काम करत आहेत. राजामणी यांच्या या पराक्रमाचे राज्यस्तरीय कौतुक होत आहे. तसेच कलाकार सुबोध केरकर यांनी आपल्या सोशल मिडीयावर राजामणी यांच्या या पराक्रमाची पोस्ट टाकत त्यांचे कौतुक केले.