शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

गोव्यात आता 'व्हॅक्सिन टुरिझम'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 23:25 IST

कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ तसेच देशातील अन्य राज्यांमधून काहीजण गोव्यात नोंदणी करीत असल्याने गोव्यात आक्षेप घेतला जात आहे.

पणजी : कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ तसेच देशातील अन्य राज्यांमधून काहीजण गोव्यात नोंदणी करीत असल्याने गोव्यात आक्षेप घेतला जात आहे. भूमिपुत्रांवरील अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठविणाऱ्या गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाने हा विषय उचलून धरला आहे. गोवा राज्य स्वतःच्या खर्चाने लसी खरेदी करीत असताना परप्रांतातून ' कोणीही यावे आणि टपली मारून जावे ' याला आमचा विरोध आहे असे पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारला स्पष्टपणे ठणकावले आहे.

राज्य लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांचे असे म्हणणे आहे की शेजारी राज्यातील अनेकांनी १८ ते ४४ वयोगटात ऑनलाइनच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी केली आणि गोव्याच्या कोट्यातील लस घेतलीही! हा विषय अत्यंत गंभीर आहे. आरोग्य खात्याने याविषयी राज्य सरकारला कल्पना दिलेली आहे. ज्या परप्रांतीय नागरिकांनी गोव्यात लस  घेतली त्यांच्यावर कारवाई करा ,अशी विनंती आरोग्य खात्याने सरकारला केली असल्याचे डॉ. बोरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उघडपणे सांगितले आहे.हाच धागा पकडून गोवा फॉरवर्डने हा विषय उचलून धरला आहे. कोविड महामारीच्या या काळात गोवा 'व्हॅक्सिन टुरिझम डेस्टिनेशन' ठरले आहे. गोव्याची ओळख पूर्वी किनारी पर्यटन तसेच ऐतिहासिक धार्मिक स्थळांपुरतीच मर्यादित होती. पर्यटकांना किनार्‍यांवरून राज्यातील अंतर्गत भागात नेण्यासाठी धबधबे, अभयारण्ये तसेच इतर गोष्टींचा आधार घेण्यात आला. 'हिंटरलॅंड टुरिझम' ही संकल्पना रुजू लागली. मध्यंतरी वैद्यकीय पर्यटनानेही गोव्यात पाळेमुळे रुजविली.  पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आतापर्यंत गोवेकरांनी अनुभवले असतानाच आता लस घेण्यासाठी परप्रांतातून गोव्यात येणारे महाभाग पाहून  'व्हॅक्सिन टुरिझम'च्या या प्रकारावरून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्य सचिवांना बरेच फैलावर घेतले आहे. कारण परवाच रात्री आरोग्य सचिव रवी धवन यांनी गोव्यात लस घेणाऱ्या परप्रांतीयांचे समर्थन केले होते.   आरोग्य सचिवांकडून समर्थन!

गोव्याचे आरोग्य सचिव रवी धवन म्हणाले होते की, केंद्राचे स्पष्ट आदेश आहेत, लसीकरणाच्या बाबतीत या राज्याचा नागरिक आणि त्या राज्याचा नागरिक असा भेदभाव करू नये. त्यामुळे त्यामुळे लसीकरणासाठी परप्रांतीयांनी नोंदणी केली तरी त्यास आक्षेप घेता येणार नाही. दरम्यान, परप्रांतीय गोव्यात येऊन कोविड प्रतिबंधक लस घेतात, हा विषय आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :goaगोवाCorona vaccineकोरोनाची लस