लीजक्षेत्रे रिकामी करा; सरकारच्या १५९ माजी लीजधारकांना नोटीसा

By मयुरेश वाटवे | Published: April 4, 2023 05:41 PM2023-04-04T17:41:06+5:302023-04-04T17:41:19+5:30

तसे न केल्यास माईन्स व मिनरल कायद्याअंतर्गत लीजक्षेत्रातील यंत्रसामग्रीसह लीज ताब्यात घेण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.

vacate the leased areas; Notice to 159 ex-lease holders of Govt | लीजक्षेत्रे रिकामी करा; सरकारच्या १५९ माजी लीजधारकांना नोटीसा

लीजक्षेत्रे रिकामी करा; सरकारच्या १५९ माजी लीजधारकांना नोटीसा

googlenewsNext

पणजी - लीजची मुदत संपल्याने लीजधारकांना लीजक्षेत्र सोडण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत खाण खात्याकडून देण्यात आली आहे. या संदर्भात खाण खात्याकडून १५९ माजी लीजधारकांना नोटीस बजावली आहे.

तसे न केल्यास माईन्स व मिनरल कायद्याअंतर्गत लीजक्षेत्रातील यंत्रसामग्रीसह लीज ताब्यात घेण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. याबाबत खाण खात्याने ३ एप्रिल रोजी आदेशही जारी केला होता. परंतु आता सार्वजनिक नोटीसही बजावण्यात आली आहे. खाण लिजांची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली होती आणि सरकारने लीजधारकांना त्यांची संबंधित लिजक्षेत्रे खाली करण्याची नोटीस बजावली होती. मागील सूचनेनंतर ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला असल्याने, सरकारने त्यांना एक महिन्याच्या आत लीजक्षेत्रे रिकामी करण्यास सांगितले आहे.

Web Title: vacate the leased areas; Notice to 159 ex-lease holders of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.