शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून उत्पल पर्रीकर लढवणार पणजी विधानसभेची पोटनिवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:38 IST

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली असून, भाजपतर्फे उत्पल पर्रीकर  हे पणजीतून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता दाट बनली आहे.

 पणजी  - मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली. येत्या 19 मे रोजी पणजीसाठी निवडणूक होत असून,  23 मे रोजी मतमोजणी केली जाईल.  भाजपतर्फे उत्पल पर्रीकर  हे पणजीतून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता दाट बनली आहे.

पोटनिवडणुकीबाबतची अधिसूचना 22 एप्रिल रोजी जारी होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज सादर होण्यास आरंभ होईल. अर्जाची छाननी 30 एप्रिल रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास 2 मे रोजी मुदत आहे. रविवारी 19 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 23 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तसेच शिरोडा, म्हापसा व मांद्रे मतदारसंघातीलही पोटनिवडणुकीची मतमोजणी ही 23 मे रोजीच आहे. लोकसभेसाठी मतदान मात्र दि. 23 एप्रिलला आहे.

पणजीत सुमारे 22 हजार 482 मतदार आहेत. त्यापैकी तेरा हजार मतदार हे बहुजन समाजातील आहेत. सुमारे तीन हजार सारस्वत समाजातील तर बाराशे ते दीड हजार मुस्लिम धर्मिय मतदार आहेत. सहा हजार मतदार हे  ख्रिस्ती  धर्मिय आहेत. भाजपतर्फे यापूर्वी दोनवेळा सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हे पणजीत लढले व विजयी झाले. गेल्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ पणजीत काँग्रेस पक्ष कधी जिंकलेला नाही. माजी मुख्यमंत्री पर्रीकर  यांच्या निधनामुळे पणजीत जी सहानुभूतीची स्थिती निर्माण झाली, त्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांचे मोठे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट द्यावे असा आग्रह काही भाजप कार्यकर्ते तसेच काही नगरसेवकांनीही धरला आहे. काही कार्यकर्ते मात्र कुंकळ्ळ्य़ेकर हे अनुभवी असल्याने कुंकळ्ळ्य़ेकर यांनाच तिकीट द्यावे, असेही सूचवित आहेत. कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका होत आहेत. उत्पल यांनी अजून आपण पोटनिवडणूक लढवीन असे जाहीर केलेले नाही पण तो लढेल, असे त्यांच्या परिचयाच्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी लोकमतला सांगितले. उत्पलना पणजी मतदारसंघ पूर्णपणे ठाऊक आहे, ते अनेकदा पणजीतील बहुतेक घरांमध्ये वडिलांसोबत फिरलेले आहेत, असे काही कार्यकत्र्यानी सांगितले.

बाबूश मोन्सेरात हे 2017 साली पणजीतील निवडणूक हरले आहेत. नंतरची पोटनिवडणूक त्यांनी लढवली नाही. आता ते गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा पणजीतून अपक्ष लढू पाहत आहेत. आपला तसा निर्णय त्यांनी मंगळवारीही येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केला.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाElectionनिवडणूक