शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:38 IST

जलस्रोत विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोलीः महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्याच्या दोन्ही शेजारील राज्यांनी आता पाण्यासाठी शह देण्यास आरंभ केल्याने राज्यावर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. या बेकायदा कृतीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असुन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने धरण भागाची पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर अहवाल व एकूण परिस्थितीचे करण्यास पाठवले. या टीमने या भागाची पाहणी केली असून ते आपला अहवाल सदर करणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने असे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे आवश्यक पाऊले तातडीने उचलण्यात येत असून अहवाल हाती येताच पुढील कृती करण्याबाबत निश्चित केले आहे.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्र अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबतचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. विर्डी येथील चालू असलेले काम बेकायदा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आगामी भुमीका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धपातळीवर काम

सध्या अवजड मशिनरी तसेच मोठे ट्रक, जेसीबी व इतर मशिनरींच्या सहाय्याने युध्दपातळीवर काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वक्षतोड करून जाळपोळ करून परिसर साफ केला जात आहे. पश्चिम रत्नागिरी पाटबंधारे खात्यातर्फे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी कठोर व्हावे 

हलतरा नदीवर एका बाजूने कर्नाटक व आता महाराष्ट्राने धरणाचे बेत निश्चित केल्याने दुहेरी भीती आहे. वाळवंटी नदीवर असलेले साखळी व पदोषे जलप्रकल्प संकटात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कडक भुमीका घेण्याची मागणी केरकर यांनी केली आहे.

काय म्हणाला होता लवाद ?

पर्यावरण कार्यकर्ता राजेंद्र केरकर यांच्या मते महाराष्ट्राला लवादाने १.३३ टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र बोगदा तयार करून तिळारी खोऱ्यात पाणी नेण्याची योजना आहे. २०१३ साली लवादाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कान पिचक्या देताच बेकायदा चालू असलेले काम बंद ठेवले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र