एस टींना लक्ष्य करण्यासाठी गोव्यात अर्बन नक्षललाईट्स वावरताहेत
By वासुदेव.पागी | Updated: December 30, 2023 14:38 IST2023-12-30T14:38:04+5:302023-12-30T14:38:30+5:30
एसटींना जवळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना संदेश

एस टींना लक्ष्य करण्यासाठी गोव्यात अर्बन नक्षललाईट्स वावरताहेत
पणजीः अनुसूचित जमातीच्या समाजाच्या लोकांना जवळ करा. कारण राज्यात अर्बन नक्क्षलवादी फिरत असून या समाजातील लोकांना ते लक्ष्य करीत आहेत असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना समाजाच्या तळागाळात पोहचण्याचा संदेश दिला. विशेष करून अनुसूचित जमात समाजातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना जवळ करा. ते आपले मतदार आहेत, परंतु प्रत्यक्ष पक्षाच्या कामात त्यांना सामावून घ्या. कारण अर्बन नक्षलवादी आता गोव्यातही पोहोचले असून या समाजाला विध्वंसक दिशेने नेण्यासाठी ते लक्ष्य करीत आहेत असे त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा संदेश त्यांनी दिला. भाजपच्या राज्यासरकारच्या सर्व योजना तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती त्यांना द्या. मश्चिमारांपर्यंतही पोहोचा असे त्यांनी सांगितले.
राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे यावेळी भाजपच जिंकणार आहेत यात संशय नाही, परंतु आपल्याला मोठ्या मताधिक्याने हे विजय मिळवायचे आहेत. दक्षिण गोव्यात तर आपल्याला ६० हजार मताधिक्याने विजय मिळवायचा आहे असे त्यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तनावडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.