मिकींच्या सुटकेपर्यंत मंत्रिपद रिक्तच
By Admin | Updated: April 5, 2015 01:17 IST2015-04-05T01:14:08+5:302015-04-05T01:17:28+5:30
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एक जागा नुवेचे वादग्रस्त आमदार मिकी पाशेको यांच्यासाठी रिक्तच ठेवावी,

मिकींच्या सुटकेपर्यंत मंत्रिपद रिक्तच
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एक जागा नुवेचे वादग्रस्त आमदार मिकी पाशेको यांच्यासाठी रिक्तच ठेवावी, असे तत्त्वत: ठरले असल्याची माहिती शनिवारी मिळाली.
अभियंता मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही दोषी ठरविल्यामुळे पाशेको यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी हा राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याशी चर्चा केली. आपली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे, याची कल्पना पाशेको यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. सर्वोच्च न्यायालयाने जर फेरविचार याचिका फेटाळली, तर पाशेको यांना गजाआड व्हावे लागणार आहे. तथापि, याचिकेवर सकारात्मक निर्णय आला, तर पाशेको यांना सरकार पुन्हा मंत्रिमंडळात घेणार असल्याचे भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
फेरविचार याचिका फेटाळली गेली व पाशेको यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार सहा महिन्यांचा तुरुंगवास घडला, तर सहा महिन्यांनंतर पाशेको यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. त्यासाठीच जागा रिक्त ठेवावी, असे ठरले आहे. (पान २ वर)