लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : नगरगाव, वाळपईसह संपूर्ण सत्तरी तालुक्यात काल गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपासून आकाश मेघांनी दाटून आले होते आणि वातावरणात अंधार पसरला होता. सुमारे चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
अचानक आलेल्या पावसामुळे सध्या काजू बागायतीच्या कामात गुंतलेल्या शेतकरी व कामगार वर्गाची मोठीच धांदल उडाली. काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगतची घरे व बसथांबे यांचा आसरा घ्यावा लागला. संध्याकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू राहिला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, वाळपई परिसरासह मोर्ले, पर्ये, केरी या भागांतही गारवा पसरला.
रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना
मोर्ले येथे वादळी वाऱ्यामुळे काही झाडे रस्त्यावर व घरांवर कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली.
Web Summary : Unexpected rain lashed Nagaragaon, disrupting farmers harvesting cashew. Strong winds and lightning accompanied the downpour. Trees fell, blocking roads, but firefighters quickly cleared debris, restoring traffic flow. The sudden change brought cooler temperatures.
Web Summary : नगरगाँव में अप्रत्याशित बारिश हुई, जिससे काजू की कटाई कर रहे किसान बाधित हुए। तेज हवाओं और बिजली के साथ बारिश हुई। पेड़ गिर गए, जिससे सड़कें अवरुद्ध हो गईं, लेकिन अग्निशमन कर्मियों ने तुरंत मलबा हटाकर यातायात बहाल कर दिया। अचानक आए बदलाव से तापमान में गिरावट आई।