union minister Shripad Naik shifted to VVIP room from ICU | श्रीपाद नाईक यांना आयसीयूतून व्हीव्हीआयपी खोलीत हलवले

श्रीपाद नाईक यांना आयसीयूतून व्हीव्हीआयपी खोलीत हलवले

पणजी : केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना आता गोमेकॉ इस्पितळाच्या आयसीयू विभागातून १२१ वॉर्डाच्या व्हीव्हीआयपीखोलीत (क्रमांक एक) हलविण्यात आले आहे.

वाहन अपघतानंतर गेले अनेक दिवस नाईक हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते. ते ठीक होत आहेत. गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांच्या रक्त चाचण्यांचे सर्व अहवालही नॉर्मल आहेत. अजून त्यांना नेसल ऑक्सीजन दिला जात आहे. त्यांचे ऑक्सीजन सेच्युरेशन १०० टक्के आहे. नाईक यांना झालेल्या जखमा ठीक होत आहेत. त्या भरून येत आहेत. त्यांना फिजिओथेरपी देणे सुरू ठेवले आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी पुन्हा आयसीयूला भेट दिली व नाईक लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

Web Title: union minister Shripad Naik shifted to VVIP room from ICU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.