‘फॅबइंडिया’चे अकराजण चौकशीच्या घेऱ्यात
By Admin | Updated: April 8, 2015 00:25 IST2015-04-08T00:01:16+5:302015-04-08T00:25:40+5:30
पणजी : कांदोळी येथील ‘फॅबइंडिया’ शोरुममधील छुप्या कॅमेऱ्याप्रकरणी चौकशीसाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापकीय

‘फॅबइंडिया’चे अकराजण चौकशीच्या घेऱ्यात
पणजी : कांदोळी येथील ‘फॅबइंडिया’ शोरुममधील छुप्या कॅमेऱ्याप्रकरणी चौकशीसाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक मंगळवारी चौकशीसाठी फिरकलेच नाहीत. शोरुमच्या व्यवस्थापिका चैत्राली सावंत यांनी दुपारी सीआयडी गुन्हा शाखेत हजेरी लावली असता, त्यांचा जबाब घेण्यात आला. एकूण ११ जण चौकशीच्या घेऱ्यात आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला. व्यवस्थापिका चैत्राली यांना सोमवारी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. (पान २ वर)