शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दाबोळी विमानतळासमोरील उड्डाणपुलावरून कोसळून दोन तरुण ठार

By पंकज शेट्ये | Updated: October 25, 2023 17:44 IST

पॅटसन आणि प्रज्वल दोघे कर्नाटकचे असल्याची प्राथमिक माहिती

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या ‘ग्रेड सेप्रेटर’ उड्डाण पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण थेट महामार्गावर कोसळून ठार होण्याचा धक्कादायक अपघात बुधवारी घडला. या भीषण अपघातात पॅटसन रॉड्रिग्स (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या २७ वर्षीय प्रज्वल रॉड्रिग्स याचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भरधाव वेगाने उड्डाण पुलावरून जाताना ताबा सुटून ही दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या जबर धडकेनंतर पॅटसन आणि प्रज्वल दोघेही पुलावरून खालच्या महामार्गावर कोसळले. दोघीही होन्नावर (कर्नाटक) येथील असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.

वास्को पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (दि. २५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. पॅटसन आणि प्रज्वल हे मोटरसायकलने (केए ४७ यू २९४०) दाबोळी विमानतळावर जाणाऱ्या ‘ग्रेड सेप्रेटर’ उड्डाण पुलावरून जात होते. भरधाव वेगाने जाताना वळणावर मोटरसायकलवरील ताबा सुटला. मोटारसायकल उड्डाण पुलाच्या कठड्यावर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरुन दोघेही उड्डाणपुलाच्याखालच्या महामार्गावर कोसळले. तर दुचाकी उड्डाणपुलावरच पडली होती.

अपघात झाल्याचे पाहताच स्थानिकांनी धाव घेतली. त्वरील १०८ रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेने चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यापूर्वीच पॅटसन रॉड्रिग्सचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात गंभीर जखमी प्रज्वल याला पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वास्को पोलिसांनी अपघाताचा आणि पॅटसन याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवागृहात पाठवला. अपघातावेळी दुचाकी कोण चालवत होता त्याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgoaगोवा