शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पर्वरी येथील अपघातात दुचाकीस्वार ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:23 IST

पर्वरी येथे केटीएम शोरूमजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

म्हापसा -  पर्वरी येथे केटीएम शोरूमजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन कुलासो हा २३ वर्षिंय युवक आपल्या अ‍ॅक्टीवा स्कूटर क्रमांक जीए ०३ एडी ३६२८ वरून मित्र मोसीन फर्नांडीस सोबत पणजीहून म्हापशाला जात होता. केटीएम शोरूमजवळ मागून येणाºया ट्रक क्रमांक जीए ०४ टी ११६० ने दुचाकीला जोराने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार जीवन कुलासाचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर आपटले आणि गंभीर जखमी झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या त्याच्या मित्राला मोसीन फर्नांडीसला किरकोळ जखमा झाल्या. दोघा जखमीना ताबडतोब बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. इस्पितळात पोहोचल्यावर डॉक्टरानी दुचाकीस्वार जीवन कुलासो याला मृत घोषित केले. तर मोसीन फर्नांडीसवर वैद्यकीय  उपचार चालू आहेत.

पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ट्रकचालक राजकुमार टांकसाळे याला  निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक केली आहे. मृत दुचाकीस्वार जीवन कुलासो हा मंगळूर येथील असून तो पिळर्ण सेमीनारीत रहात होता. पोलीस उपनिरिक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात