बोरीतील अपघातात दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: January 16, 2016 01:54 IST2016-01-16T01:52:39+5:302016-01-16T01:54:38+5:30
फोंडा : अवेडे-बोरी येथे झालेल्या अपघातात टोनिटो आंतोनियो कुएल्हो (वय ५१, रा. कुडतरी, सासष्टी) यांचा जागीच मृत्यू झाला.

बोरीतील अपघातात दुचाकीस्वार ठार
फोंडा : अवेडे-बोरी येथे झालेल्या अपघातात टोनिटो आंतोनियो कुएल्हो (वय ५१, रा. कुडतरी, सासष्टी) यांचा जागीच मृत्यू झाला. ते उसगाव येथील नेस्ले कंपनीत कामाला होते. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, टोनिटो हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून (क्र. जीए 0२ डी ३८९३) कामावर जाण्यासाठी निघाले होते. अवेडे-बोरी येथे पोहोचताच आपल्या समोरून जाणाऱ्या एका रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेल्याने ते रस्त्यावर पडले व फोंड्याहून वेर्णा येथे निघालेल्या मालवाहू ट्रकाच्या (क्र. एमएच ४२ बी ९८१७) मागच्या चाकाखाली आले. यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टोनिटो यांनी घातलेल्या हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले होते.
फोंडा पोलिसांना या अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीला पाठवून दिला.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. नंतर तो स्वत: पोलिसांत हजर झाला. त्याचे नाव सुशील बाबूराव धुमाळ (वय ३६, रा. झिरपवाडी-सातारा, महाराष्ट्र) असे असून फोंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
उपनिरीक्षक हरीश नाईक या प्रकरणी तपास करत आहेत.
(प्रतिनिधी)