पेडण्यातील आठवडी बाजारात दोन वाहनांना आग

By Admin | Updated: March 9, 2017 16:41 IST2017-03-09T16:41:23+5:302017-03-09T16:41:23+5:30

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील न्यायालयाजीळ दुपारी दोन गाड्यांना लाग लागून ६ लाखांची आर्थिक नुकसानी झाली आहे

Two vehicles fire in the market for weekend | पेडण्यातील आठवडी बाजारात दोन वाहनांना आग

पेडण्यातील आठवडी बाजारात दोन वाहनांना आग

ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 9 - उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील न्यायालयाजीळ दुपारी दोन गाड्यांना लाग लागून ६ लाखांची आर्थिक नुकसानी झाली आहे. आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागून इको मारुती व एक पिकअप मिळून दोन वाहने जळून खाक झाली.
पेडण्यात आठवडी बाजार असल्याने बरीच गर्दी होती. या बाजारासाठी शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी आपापली वाहने घेऊन बाजाराला येतात. आणलेल्या वाहनातून आपल्या मालाची विक्री करतात. ज्या वाहनांना आग लागली त्यात विक्रीसाठी आणलेला माल होता. न्यायालयासमोरील खुल्या जागेत ही वाहने पार्क करून ठेवली होती. त्यावेळी सदरची आगीची घटना घडली. पेडणे अग्निशामक दलाने लागलीच हालचाल करून लागलीच आगीवर नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)  

Web Title: Two vehicles fire in the market for weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.