म्हापसा अपघातात दोन ठार
By Admin | Updated: May 6, 2015 02:28 IST2015-05-06T02:28:00+5:302015-05-06T02:28:13+5:30
बार्देस : करासवाडा-म्हापसा येथे भरधाव कारने प्रवासी बसला दिलेल्या जोरदार धडकेत दोघे ठार झाले, तर २३ प्रवासी जखमी झाले.

म्हापसा अपघातात दोन ठार
बार्देस : करासवाडा-म्हापसा येथे भरधाव कारने प्रवासी बसला दिलेल्या जोरदार धडकेत दोघे ठार झाले, तर २३ प्रवासी जखमी झाले. कार रस्त्यालगतच्या घळीत कोसळली, तर बस रस्त्याच्या मधोमध उलटली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन लोकांची प्रचंड गैरसोय झाली. हा अपघात मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
पत्रादेवीहून म्हापशाकडे येणाऱ्या प्रवासी बसला (क्र. जीए ०१, टी ५१४२) ) करासवाडाहून कोलवाळकडे जाणाऱ्या कारने (क्र. जीए ०३, एच ३७८६) करासवाडा येथील चार रस्त्यापासून १०० मीटर अंतरावरील कोलवाळच्या उतरणीवर धडक दिली. या अपघातात फैजल एसीन बेपारी (१८ रा. माडेल-थिवी) आणि रामचंद्र अंकुश परब (३५ रा. तोरसे-पेडणे) जागीच ठार झाले. तसेच एकूण २३ जण जखमी झाले.
(पान ७ वर)