शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गोव्यात मटका प्रकरणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची दोन तास चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 19:22 IST

 पणजी, दि. २२ -  गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मटका साहित्य घरात सापडल्या प्रकरणी सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दोन तास चौकशी केली. ‘माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. घर भाऊ बाबल याच्या नावावर आहे. तोच अधिक माहिती देऊ शकेल,’ असे पालूपद कवळेकर यांनी चौकशीच्यावेळी चालू ठेवले. या प्रकरणात ...

 पणजी, दि. २२ -  गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मटका साहित्य घरात सापडल्या प्रकरणी सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दोन तास चौकशी केली. ‘माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. घर भाऊ बाबल याच्या नावावर आहे. तोच अधिक माहिती देऊ शकेल,’ असे पालूपद कवळेकर यांनी चौकशीच्यावेळी चालू ठेवले. या प्रकरणात त्यांचा बंधू बाबल कवळेकर याला समन्स काढण्यात आले असून, सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, कवळेकर यांना मडगांव सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. मटका साहित्याच्या प्रकरणात आपल्याला काहीच माहीत नाही अशी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका बाबू यांनी गुन्हे शाखेच्या अधिका-यांसमोर घेतली. घर भावाच्या नावावर आहे, हेच उत्तर ते प्रत्येक प्रश्नाला देत होते. आपण नेहमीच कामात व्यस्त असतो. अशा अवैध गोष्टी आपण करुच शकत नाही. आपल्याकडे त्यासाठी वेळही नसल्याचे एका प्रश्नावर त्यांनी तपास अधिका-याला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.  बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाबूंच्या बेतुल येथील निवासस्थानी धाड घालून हजारो मटका स्लिप तसेच तत्सम साहित्य जप्त केले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. रायबंदर येथील सीआयडी गुन्हे शाखेत दाखल झाल्यानंतर दुपारी १२.१५ वाजता कवळेकर निरीक्षक विश्वेश कर्पे व अन्य अधिका-यांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी सुरु झाली. दुपारी २ वाजेपर्यंत चौकशी चालू होती.  मडगांव सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाचा आदेश घेऊनच बाबू आले होते.    काहीही चुकीचे केलेले नाही : कवळेकर पोलिसात हजर होण्याआधी बाबू कवळेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘ चौकशीसाठी पोलिस अधिका-यांना मी पूर्णपणे सहकार्य करीत आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.’

टॅग्स :Policeपोलिस