आज दोन तास फेरीबोटी बंद
By Admin | Updated: October 12, 2015 02:02 IST2015-10-12T02:02:24+5:302015-10-12T02:02:38+5:30
पणजी : नदी परिवहन खात्याचे कर्मचारी आज, सोमवारी दोन तास लाक्षणिक संप करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने संप मोडून काढण्यासाठी एस्मा

आज दोन तास फेरीबोटी बंद
पणजी : नदी परिवहन खात्याचे कर्मचारी आज, सोमवारी दोन तास लाक्षणिक संप करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने संप मोडून काढण्यासाठी एस्मा लागू केला असला तरी तो मोडून काढीत सकाळी ९ ते ११ असे दोन तास राज्यातील सर्व फेरीबोटी बंद ठेवल्या जाणार आहेत.
१७ महिन्यांचा अतिरिक्त कामाचा थकीत मोबदला (ओव्हरटाईम) कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही, तसेच वेळेत पगारही मिळत नाही, असे या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या आयटक संघटनेचे सचिव सुहास नाईक यांनी सांगितले. सर्व फेरीबोटी दोन तास बंद राहतीलच, असे त्यांनी सांगितले. बंदर कप्तान जेम्स ब्रागांझा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास बजावले आहे. वैद्यकीय कारण वगळता अन्य कारण गैरहजेरीसाठी खपवून घेतले जाणार नसून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. १९८८च्या अत्यावश्यक सेवा कायदा कलम ३ उपकलम १ खाली हा आदेश काढला आहे. (प्रतिनिधी)