शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चोपडे-शिवोली पुलावरील भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:21 IST

संतप्त जमावांनी महाराष्ट्र नोंदणीकृत संशयितांची गाडी पेटविली

म्हापसा : उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील चोपडे-शिवोली  पुलावर झालेल्या भीषण अपघातात मोरजीतील ख्रिश्चन कुटुंबियातील बाप व लेक असे दोघे जागीच ठार झाले. तर उर्वरित चौघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्रातील चारचाकीला संतप्त स्थानिकांकडून आग लावून पेटवून दिली. त्यामुळे पुलावर अर्धातास आगीचे लोट अन् धुर पसरला होता. त्यानंतर अग्निशामक दलाने धाव घेऊन ही आग विझवली. पुलावर मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

घटनेनंतर पुलावरील वातावरण तंग होते. अपघातानंतर स्थानिकांनी पुलावरील दोन्ही बाजुने वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्रातील संशयित पाचजणांना ताब्यात घेऊन पुलावरील वाहतूक तब्बल पाच तासानंतर सुरळीत केली. जुआंव फर्नांडिस (६२), जुडास फर्नांडिस (२५) अशी मयताची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज रविवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजता घडला. फर्नांडिस कुटुंबीयातील चार सदस्य व त्यांचे इतर दोन मित्र सर्वजण राहणारे (विठ्ठदासवाडा-मोरजी) आहेत. 

हे कुटुंबिय शिवोलीतील चर्चमध्ये फेस्तनिमित्त प्रार्थनेसाठी जाताना हा अपघात घडला. संशयितांच्या गाडीने विरोधी दिशेने येत असलेल्या मयताच्या गाडीला जोरदार ठोकर दिली. हा अपघाताची तीव्रता भीषण होती की याचा आवाज आसपासच्या घरापर्यंत गेला. अपघातानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी जखमींना त्वरित १०८ गाडीतून जिल्हा इस्पितळात नेले व तिथून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. पुलावरून जाताना बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरोध दिशेने येणाऱ्या या गाडीला त्यांनी ठोकर मारली. 

 

अपघातानंतर बराचवेळ पुलावर पोलिस व स्थानिकांमध्ये बाचाबाची व वाद सुरू होता. अपघातील सर्व संशयितांनी ताब्यात घेऊन त्यांना पुलावर आणण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. मात्र, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस चंदन चौधरी व म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक, हणजूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवलेश देसाई व इतर पोलिस अधिकारी हे जमावाची समजूत काढण्यात शर्तीचे प्रयत्न करीत होते. यावेळी काहीजण गर्दीचा फायदा घेत पोलिसांनी शिवीगाळ व टोमणेबाजी करीत होते. 

दरम्यान, पोलिसांकडून सर्व संशयितांची नावे व त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर जमावाने वाहतूक खुली केली. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त गाड्या पुलावरून बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात