गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
By काशिराम म्हांबरे | Updated: October 20, 2023 14:09 IST2023-10-20T14:04:11+5:302023-10-20T14:09:08+5:30
कोलवाळ पोलिसांनी गणेश नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
काशिराम म्हांबरे
म्हापसा : कोलवाळ पोलिसांनी गणेश नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने अवैधरित्या बाळगलेला दिड किलो वजनाचा तसेच दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. संशयित अमीत कुमार सोंकर (वय २१, गणेश नगर-कोलवाळ ) तसेच दिनेश सोनी ( वय २७, कुचेली बार्देश ) हे अंमली पदार्थ घेऊन ग्राहकाला वितरीत करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. रचलेल्या सापळ्यात ते सापडल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन तसेच त्यांनी वापरलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कोलवाळ पोलिसांनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिमांडसाठी त्यांना न्यायालया समोर उपस्थित केले जाणार असल्याचे राणे म्हणाले. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक रोहन मडगांवकर यांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.