ट्रकमालकांची पुन्हा बॉम्बे रोडला धडक

By Admin | Updated: October 31, 2015 02:21 IST2015-10-31T02:20:52+5:302015-10-31T02:21:17+5:30

फोंडा : खनिज मालाच्या वाहतुकीचा सुधारित दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा

Truckers again hit on Bombay Road | ट्रकमालकांची पुन्हा बॉम्बे रोडला धडक

ट्रकमालकांची पुन्हा बॉम्बे रोडला धडक

फोंडा : खनिज मालाच्या वाहतुकीचा सुधारित दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बॉम्बे रोड-पाळी येथे दाखल होत निदर्शने केली. गुरुवारी संघटनेच्या सदस्यांनी डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक रमेश गावकर व डिचोलीचे संयुक्त मामलेदार विशांत सावंत यांच्या शिष्टाईनंतर माघार घेतली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा सुमारे ५0-६0 सदस्य पाळी येथे जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ट्रकमालक बॉम्बे रोड येथे जमल्याची माहिती मिळताच डिचोलीहून पोलीस पाठविण्यात आले. या वेळी ट्रकमालकांनी खनिज वाहतूक करणारे काही ट्रक अडवून पोलिसांकरवी त्या ट्रकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना सोडून दिले. दुपारपर्यंत बॉम्बे रोड येथे ठाण मांडून अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रकमालक माघारी फिरले.
सेसातर्फे कोडली ते आमोणापर्यंत सर्व ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Truckers again hit on Bombay Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.