ट्रकमालक आक्रमक!

By Admin | Updated: October 31, 2015 02:22 IST2015-10-31T02:15:59+5:302015-10-31T02:22:32+5:30

पणजी/फोंडा/डिचोली : सेसा गोवा कंपनीने लिलावात घेतलेल्या खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना दर वाढवून द्यावेत,

Trucker aggressive! | ट्रकमालक आक्रमक!

ट्रकमालक आक्रमक!

पणजी/फोंडा/डिचोली : सेसा गोवा कंपनीने लिलावात घेतलेल्या खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना दर वाढवून द्यावेत, ही अखिल गोवा ट्रकमालक संघटनेची मागणी कंपनीने धुडकावून लावली असून प्रत्युत्तरादाखल कंपनीच्या मालाची वाहतूक करणारे ट्रक पाळी येथे अडवत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला असल्याचा दावाही संघटनेने शुक्रवारी केला असून दोन्ही बाजूंच्या आडमुठ्या पवित्र्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अखिल गोवा ट्रकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक शुक्रवारी साखळी येथील रवींद्र भवनमध्ये सेसा गोवा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झाली. या वेळी आमदार प्रमोद सावंत, डिचोलीचे पोलीस अपअधीक्षक रमेश गावकर, पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांचीही उपस्थिती होती. मध्यस्थी करताना आमदार डॉ. सावंत यांनी, किमान १ रुपये प्रतिकिलोमीटरने दर वाढवून द्यावा, अशी विनंती केली. मात्र, कंपनीने एक पैसाही वाढवता येणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्याचा निषेध म्हणून आंदोलन चालूच राहील. मुख्यमंत्र्यांसोबत ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा असली, तरी तोपर्यंत वाहतूक चालू देणार नाही, अशी भूमिका अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पाळीचे सरपंच महेश गावस यांच्या अध्यक्षतेखालील उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेने याप्रकरणी सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर आम्ही मालवाहतूक करत असून प्रत्यक्ष खनिज उत्पादन सुरू झाल्यानंतरच सुधारित दर मिळवण्यासाठी आपण रदबदली करीन, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे आश्वासन ते पाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (पान २ वर)

Web Title: Trucker aggressive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.