शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

‘Trinamoo Congress’ गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर करणार, Prashant Kishore यांचा Lokmatशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 11:55 IST

Trinamoo Congress: येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठीचा आमचा उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतीकार Prashant Kishore यांनी बुधवारी खास ‘लोकमत’ला सांगितले.

- सदगुरू पाटीलपणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) विधानसभा निवडणुका पूर्ण शक्तीने व क्षमतेने लढविणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचा आमचा उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी खास ‘लोकमत’ला सांगितले.किशोर हे गोवा भेटीवर आले आहेत. ‘लोकमत’चे गोवा निवासी संपादक सदगुरू पाटील यांनी किशोर यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तृणमूल काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी नुकताच प्रवेश केला. गोव्यात काँग्रेस व सत्ताधारी भाजपला अस्थिर करण्याच्या दृष्टीने तृणमूल कामाला लागला असल्याचे संकेत मिळतात. याविषयी प्रशांत किशोर यांना विचारले असता ते म्हणाले,“मोदी-अमित शहा यांच्या भाजपला पराभूत करता येते, हे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दाखवून दिले. आम्ही गोव्यात हेच दाखवून देणार आहोत. जेव्हा विरोधातील काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याबाबत कमी पडतो, तेव्हा लोक दुसरा पर्याय शोधतात. आम्ही मणिपूरवगैरे भागात गेलो नाही. तिथे काँग्रेस पक्ष सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढतोय. गोव्यात मात्र काँग्रेसने सर्व तलवारी म्यान केलेल्या आहेत.”  

विजयबाबू दर्डांविषयी विचारपूस दरम्यान, प्रशांत किशोर यांनी लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन विजयबाबू दर्डा यांच्याविषयी मोठ्या आस्थेने विचारपूस केली. आपण दिल्लीत एकदा दर्डा यांना भेटलो होतो. आता ते कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, माझा नमस्कार त्यांना कळवा, असे किशोर म्हणाले. 

प्रसाद गावकर यांचा पाठिंबा गोव्यातील अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना काँग्रेसचे निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काँग्रेसमध्ये येण्याची व पुढील निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याची ऑफर दिली होती. मात्र गावकर यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली व बुधवारी त्यांनी मी पुढील निवडणूक तृणमूलतर्फे लढवीन, असे जाहीर केले.  येत्या फेब्रुवारीमध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसgoaगोवाPrashant Kishoreप्रशांत किशोर