गोव्यात प्रवासी जलवाहतूक शक्य

By Admin | Updated: October 6, 2015 01:45 IST2015-10-06T01:45:53+5:302015-10-06T01:45:53+5:30

गोव्यातील अनेक जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करणे शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.

Traveling in Goa is possible | गोव्यात प्रवासी जलवाहतूक शक्य

गोव्यात प्रवासी जलवाहतूक शक्य

पणजी : गोव्यातील अनेक जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करणे शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर सोमवारी दिल्लीत बैठक झाली. त्यात पणजी-जुने गोवे-हळदोणा, दोनापावला, वास्को, कुठ्ठाळी, कुडतरी आदी जलमार्गांवर चर्चा झाल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
जलमार्गांवरून प्रवासी वाहतूक केल्याने सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होईल. रस्त्यांवरील अपघातही कमी होतील. आणखी काही जलमार्गही प्रवासी वाहतुकीसाठी विकसित करण्याचा विचार सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले. सागरमाला प्रकल्पाविषयी गडकरींशी सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पांतर्गत गोव्याच्या किनारी भागांतही रस्ते बांधले जातील. त्यासाठी केंद्राकडून निधी दिला जाईल, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Traveling in Goa is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.