शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांना पाठीशी घालण्याची परंपरा अबाधित, आयपीएस विमल गुप्ताची चौकशी ऐवजी गोव्यातून बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:32 IST

पणजी: एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलवर लाचखोरीचे आरोप झाले तर मागचा पुढचा विचार न करता त्याला सेवेतून निलंबित केले जाते.

पणजी: एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलवर लाचखोरीचे आरोप झाले तर मागचा पुढचा विचार न करता त्याला सेवेतून निलंबित केले जाते. परंतु वरिष्ठ अधिकारी आणि त्यातल्या त्यात आयपीएसवाल्यांच्या लाचखोरीचे पुरावे जरी सादर करण्यात आले तरी त्यांची बदली करून प्रकरण मिटविले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लाचखोरी प्रकरणात अडकलेले उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांची चौकशी करण्या ऐवजी बदली करण्यात आली आहे.खात्यांतर्गत चौकशीतून वाचविण्यासाठी 40 हजार रुपये मागितल्याचा आरोप महिला उपनिरीक्षकाकडून उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्यावर करण्यात आल्यानंतर गुप्ता यांची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणा-याच महिलेला निलंबित करण्याचा आदेश पोलीस खात्याकडून देण्यात आला. तेही गुप्ता यांनी दिलेल्या जबानीला अनुसरून. आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे गुप्ताने म्हटले होते आणि तेही त्या महिला उपनिरीक्षकाने आपण लाच दिल्याचे सांगितल्यानंतर.आयपीएस अधिका-यांना पाठीशी घालण्याची ही पहिली वेळ नसून या घटनेने पोलीस खात्याने ही परंपरा अबाधित राखली आहे. यापूर्वी महानिरीक्षक सुनील गर्ग याने गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यासाठी 5 लाख रुपये लाच मागितल्याचा गंभीर आरोप मुन्नालाल हलवाई या नागरिकाकडून करण्यात आला होता. केवळ आरोप केला नव्हता तर लाच देण्याच्या प्रकरणात गर्ग यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते आणि त्यांचे संभाषणही टीपण्यात आले होते. हे पुरावे सादर करून तक्रारही करण्यात आली होती. परंतु त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याऐवजी त्याला गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा यासाठी तक्रारदार अजूनही न्यायालयीन लढाई लढत आहे.काही वर्षांपूर्वी गोव्यात दुदू ऊर्फ डेव्हिड द्रिहम नामक इस्नयली ड्रग डिलरला अंमलीपदार्थाच्या मोठ्या साठ्यासह रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाचाही बेजबाबदारपणा उघडकीस आल्यामुळे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी विभागाचे कॉन्स्टेबल, उपनिरीक्षक यांच्यासह ब-याच जणांना निलंबित करण्यात आले होते, परंतु या विभागाचे अधीक्षक आयपीएस अधिकारी वेणू बन्सल यांच्यावर कारवाई न करता केवळ बदली करण्यात आली होती.

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवा