राज्यात ८ निरीक्षकांच्या बदल्या, सायबर विभागाला २ निरीक्षक!
By वासुदेव.पागी | Updated: December 9, 2023 15:21 IST2023-12-09T15:15:02+5:302023-12-09T15:21:22+5:30
नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जुने गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतिश पडवळकर यांची रायबंदर येथील गोवा सायबर गुन्हा पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

राज्यात ८ निरीक्षकांच्या बदल्या, सायबर विभागाला २ निरीक्षक!
पणजी: पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार पोलीस मुख्यालयाने ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गोवा सायबर पोलीस स्थानकाला अतिरिक्त निरीक्षक देण्यात आला आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जुने गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतिश पडवळकर यांची रायबंदर येथील गोवा सायबर गुन्हा पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या पोलीस स्थानकात आता दोन निरीक्षक झाले आहेत. विकास दयकर हेही सायबर विभागाचेनिरीक्षक आहेत.
इतर बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी असलेले निरीक्षक योगेश सावंत यांना जुने गोवे पोलिसस्थानकात, क्राईम ब्रँचचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांना मोपा विमानतळ पोलीस स्थानकात, वाळपई पोलीस स्थानकाचे दिनेश गडेकर यांना डिचोली पोलीस स्थानकात, मोपा विमानतळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक निनाद देऊलकर यांची क्राईम ब्रँचमध्ये, डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहूल नाईक यांची वाळपई पोलिस स्थानकात तर म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्ष सतिश गावडे यांची भ्रष्टाचार विरोधी विभागात बदली करण्यात आली आहे. हे आदेश तात्काळ लागू होत आहेत.