पर्यटन व्यावसायिकांना प्रतीक्षा पर्यटकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:51 PM2019-12-12T13:51:02+5:302019-12-12T13:51:53+5:30

व्यवसाय केव्हा बहरणार या चिंतेने स्थानिक व्यापारी ग्रासले आहेत.

Tourists waiting for tourists | पर्यटन व्यावसायिकांना प्रतीक्षा पर्यटकांची

पर्यटन व्यावसायिकांना प्रतीक्षा पर्यटकांची

Next

म्हापसा : तोंडावर आलेल्या नाताळ सणात तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायाच्या ऐन हंगामात गोव्यात पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र यंदा पहायला मिळाले आहे. आलेली आर्थिक मंदी, लांबलेला पावसाळा तसेच घसरलेला पर्यटकांचा दर्जा ही प्रमुख कारणे मानली जात असली तरी त्याचे परिणाम मात्र व्यावसायिकांवर झाले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना नाताळ तसेच नवीन वर्षाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

वर्षभराच्या तुलनेत गोव्यात नाताळ सणाला तसेच नवीन वर्षाला देशी-विदेशी पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असते पण या वर्षी मात्र अद्यापर्यंत पर्यटक हव्या त्या संख्येने दाखल झाले नसल्याने व्यावसायिकांवर त्याचे परिणाम झाले आहेत. त्या भर म्हणून किनारी भागातील शॅकांच्या उभारणीवर बराच विलंब सुद्धा झाला. पर्यटक नसल्याने समुद्रात वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय करणारे व्यवसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. हॉटेलांची आगावू नोंदणी झाली नसल्याने  व्यवसायिक चिंतेत आहेत. कॉटेजेसदेखील रिकाम्या आहेत. विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याने याचा फटका स्थानिकांसह व्यापा-यांना बसला आहे.

आपला व्यवसाय केव्हा बहरणार या चिंतेने स्थानिक व्यापारी ग्रासले आहेत. पूर्वीप्रमाणे तीन ते चार दिवस किंवा आठवडाभर राहणारे पर्यटक एक-दोन दिवस फिरून माघारी जातानाचे चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारे व्यापारी तसेच व्यावसायिकांसाठी हा मोठा आर्थिक  फटका मानला जात आहे. अशावेळी व्यवसायिकांना फक्त नाताळ व नवीन वर्षांत येणा-या पर्यटकांवर आशा लागून राहिली आहे.

पर्यटनाला मरगळ लागल्याने अद्याप किनारी पट्ट्यातील हॉटेल्समध्ये मोठ्या पार्ट्या होत नाही, त्यामुळे हॉटेल्समध्ये गायन किंवा गिटार वाजविणा-यांची सुद्धा परवड झाली आहे. अद्याप पर्यटनाला हवे तशी चालना न मिळाल्याने पर्यटनावर अवलंबून राहणा-या लहान कलाकारापासून ते मोठ्या व्यावसायिकांवर याचा फटका बसला आहे. गोव्यात येणा-या पर्यटकांची संख्या इतर वर्षाच्या तुलनेत यंदा बरीच कमी झाल्याची माहिती काही व्यवसायिकांनी दिली. 

Web Title: Tourists waiting for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा