पर्यटनमंत्र्यांना घेरले
By Admin | Updated: August 6, 2014 02:07 IST2014-08-06T02:03:48+5:302014-08-06T02:07:03+5:30
पणजी : पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून विदेशात विविध सोहळे आयोजित करणे व त्यानिमित्त विदेश दौऱ्यांवर जाणे असे प्रकार गेल्या

पर्यटनमंत्र्यांना घेरले
पणजी : पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून विदेशात विविध सोहळे आयोजित करणे व त्यानिमित्त विदेश दौऱ्यांवर जाणे असे प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू असल्याची जोरदार टीका विरोधी आमदारांनी मंगळवारी विधानसभेत करत पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना धारेवर धरले. विदेशांतील सोहळ्यांवर एकूण १४ कोटींचा खर्च झाला असून यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. दि. १ मार्च २०१२ ते आजपर्यंत पर्यटनमंत्री व पर्यटन सचिवांनी किती विदेश दौरे केले, अशी विचारणा रेजिनाल्ड यांनी केली होती. विदेशात झालेले रोड शो, प्रदर्शने, ट्रॅव्हल मार्ट या सर्वांवर मिळून किती खर्च झाला, अशीही विचारणा रेजिनाल्ड यांनी केली होती.
(खास प्रतिनिधी)