दिल्लीतील पर्यटकाचा बुडून मृत्यू; दिल्लीतील एका रिर्साटवर मॅनेजर म्हणून काम करत होता
By काशिराम म्हांबरे | Updated: December 22, 2023 13:09 IST2023-12-22T13:09:34+5:302023-12-22T13:09:42+5:30
हणजूण पोलीस स्तानकाच्या हद्दीत असलेल्या वागातोर येथील तिनाºयावर जीवन दत्ता ( वय ३२, दिल्ली ) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

दिल्लीतील पर्यटकाचा बुडून मृत्यू; दिल्लीतील एका रिर्साटवर मॅनेजर म्हणून काम करत होता
म्हापसा: काशीराम म्हांबरे
हणजूण पोलीस स्तानकाच्या हद्दीत असलेल्या वागातोर येथील तिनाºयावर जीवन दत्ता ( वय ३२, दिल्ली ) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. दिल्लीतील एका रिर्साटवर मॅनेजर म्हणून सेवेत असलेला जीवन दत्ता आपल्या इतर सहकाऱ्या समवेत गोव्यात पर्यटनासाठी आला होता. आज शुक्रवारी सकाळी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत वागातोर येथील समुद्रात तो पोहण्यासाठी गेला होता असता ही घटना घडली.
पाण्यात उतरलेल्या दत्ता याला पोहता येत नसल्याने पाण्यात गंटामळ्या खात असताना किनाऱ्यावर असलेल्या एका विदेशी नागरिकानेत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून किनाऱ्यावर आणले. लागलीच त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवचिकीत्सेसाठी त्याचा मृतदेह राखून ठेवण्यात आला असून पुढील तयार कार्य हणजूण पोलिसांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.