मगोचे तिन्ही आमदार जनतेसोबत

By Admin | Updated: November 29, 2014 01:00 IST2014-11-29T01:00:21+5:302014-11-29T01:00:54+5:30

फोंडा : सध्या कूळ-मुंडकार प्रश्नी विविध माध्यमांतून जनतेची दिशाभूल केली जात असून मगो पक्षाचे तीनही आमदार जनतेबरोबर राहणार आहेत.

Together with all three MLAs | मगोचे तिन्ही आमदार जनतेसोबत

मगोचे तिन्ही आमदार जनतेसोबत

फोंडा : सध्या कूळ-मुंडकार प्रश्नी विविध माध्यमांतून जनतेची दिशाभूल केली जात असून मगो पक्षाचे तीनही आमदार जनतेबरोबर राहणार आहेत. कूळ-मुंडकार प्रश्नी कोणालाही मदतीची गरज भासल्यास मगो पक्ष सदैव तत्पर राहाणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यात केले.
फोंडा व्यापारी संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित व्यापाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार लवू मामलेदार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर मामलेकर, समाजसेविका अ‍ॅड. स्वाती केरकर, सीटूचे अ‍ॅड. थालमन परेरा, अ‍ॅड. जतीन नाईक, कुर्टी-खांडेपारचे पंच नरेंद्र परब, पीपल आॅफ फोंडाचे मनोज गावकर, नगरसेविका निधी मामलेकर, विद्या पुनाळेकर आणि घारू सावंत उपस्थित होते.
व्यापारी संघटनेतर्फे आयोजित व्यापाऱ्यांचा सत्कार सोहळा हा योग्य व्यक्तींचा सत्कार असून स्वत:चा संसार चालवतानाच दुसऱ्याला मदत करण्याचे औदार्य या व्यापाऱ्यांत दिसून येते. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची येथील भाजपा कार्यकर्त्यांनी दिशाभूल केली. अन्यथा आज व्यापाऱ्यांची समस्या सुटली असती, असे ढवळीकर पुढे म्हणाले.
व्यापारी संघटना कशी असावी, हे फोंड्यातील व्यापाऱ्यांनी दाखवून दिले असून संघटना बळकट करायची असल्यास राजकारण्यांना चार हात दूर ठेवण्याचे आवाहनही ढवळीकर यांनी केले. तसेच संघटनेचे कार्य पुढे चालू राहावे यासाठी आपले, तसेच आपले बंधू दीपक ढवळीकर आणि आमदार लवू मामलेदार, असे तिघांचेही दोन महिन्यांचे वेतन संघटनेला देण्याचे जाहीर केले.
या वेळी सुदिन ढवळीकर आणि आमदार लवू मामलेदार यांच्या हस्ते दादू रामचंद्र नाईक, प्रेमा विष्णू नाईक, सोनू गावडे, सुश्मिता नाईक, रामा परब, काशिनाथ येडवी, हबीबा शेख, पास्किन फर्नांडिस, पार्वती गाड, एकनाथ एकावडे, सरस्वती नाईक, जुझे वाझ आणि सुशिला नाईक या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य व्यापाऱ्यांना ओळखपत्रे वितरित करण्यात आली.
या वेळी अ‍ॅड. स्वाती केरकर, अ‍ॅड. थालमन परेरा, अ‍ॅड. जतीन नाईक, नरेंद्र परब, किशोर मामलेकर, मनोज गावकर यांनीही आपले विचार मांडले. सुरुवातीला संघटनेचे सचिव महेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. घारू सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन दामोदर नाईक यांनी केले, तर घारू सावंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Together with all three MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.