पालिकांची आज मतमोजणी

By Admin | Updated: October 27, 2015 02:07 IST2015-10-27T02:06:57+5:302015-10-27T02:07:29+5:30

पणजी : राज्यातील अकरा पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू होणार आहे. मतपत्रिकांद्वारे मतदान घेतल्याने

Today's counting of corporations | पालिकांची आज मतमोजणी

पालिकांची आज मतमोजणी

पणजी : राज्यातील अकरा पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू होणार आहे. मतपत्रिकांद्वारे मतदान घेतल्याने निकालांना थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे. १५९ प्रभागांमधून ६८५ उमेदवार भवितव्य अजमावत आहेत. एकूण ३६२ कर्मचारी मतमोजणीच्या कामात असतील.
मतमोजणीची आवश्यक ती सर्व तयारी झालेली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव व्ही. पी. डांगी यांनी सांगितले. म्हापसा पालिकेची मतमोजणी पेडे येथील क्रीडा संकुलात होणार आहे. तेथे १0 टेबलांची व्यवस्था केली असून ४0 कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. डिचोलीची मतमोजणी हिराबाई झांट्ये मेमोरियल हॉलमध्ये होईल. तेथे १२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून ४८ कर्मचारी असतील. पेडणेची मतमोजणी तेथील मामलेदार कार्यालयात होणार आहे. तेथे ५ टेबलांची व्यवस्था असून २0 कर्मचारी असतील. वाळपईची मतमोजणी वन प्रशिक्षण संस्थेच्या आॅडिटोरियममध्ये होणार असून तेथे १0 टेबलांची व्यवस्था आहे आणि ४0 कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. मुरगावची मतमोजणी बायणा येथील क्रीडा प्राधिकरणाच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होईल. तेथे १५ टेबलांची व्यवस्था आहे आणि ४५ कर्मचारी मते मोजतील. मडगाव व कुंकळ्ळीची मतमोजणी माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारतीत होणार आहे. तेथे ३0 टेबलांची व्यवस्था असून ९0 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कुडचडे-काकोडा व केपे पालिकांची मतमोजणी बोरीमळ-केपे येथील सरकारी क्रीडा संकुलात होईल. तेथे १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून ४२ कर्मचारी मतमोजणीचे काम करतील.
काणकोण पालिकेची मतमोजणी तेथील पालिका सभागृहात (पान ६ वर)

Web Title: Today's counting of corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.