काही नगराध्यक्षांची आज बिनविरोध निवड

By Admin | Updated: November 4, 2015 02:19 IST2015-11-04T02:19:38+5:302015-11-04T02:19:50+5:30

काही नगराध्यक्षांची आज बिनविरोध निवड

Today unopposed selection of some mayor | काही नगराध्यक्षांची आज बिनविरोध निवड

काही नगराध्यक्षांची आज बिनविरोध निवड

पणजी/मडगाव : राज्यातील अकरापैकी काही नगरपालिकांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बुधवारी बिनविरोध निवड होणार आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याकरिता बुधवारी मुदत संपत आहे. निवडणूक गुरुवार, दि. ५ रोजी होणार आहे. काणकोण वगळता बहुतेक पालिकांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ठरले आहेत.
केपे नगराध्यक्षपदासाठी फिलू डिकॉस्ता, तर उपनगराध्यक्ष म्हणून पावलू फर्नांडिस यांची नावे निश्चित झाली आहेत. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी केपेतील काँग्रेसप्रणित आघाडीच्या ९ नगरसेवकांची आमदार बाबू कवळेकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत या दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केपे पालिकेतील ११ जागांपैकी ९ जागा कवळेकर समर्थकांनी जिंकल्या आहेत.

Web Title: Today unopposed selection of some mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.