तिसवाडी तालुका अंधारात
By Admin | Updated: January 11, 2016 01:21 IST2016-01-11T01:21:37+5:302016-01-11T01:21:45+5:30
पणजी : थिवीहून येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने रात्री आठ वाजता तिसवाडी तालुका

तिसवाडी तालुका अंधारात
पणजी : थिवीहून येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने रात्री आठ वाजता तिसवाडी तालुका अंधारात बुडाला. राजधानी शहराकरिता कदंब पठारावरील उपकेंद्रात फोंड्याहून वीज घेण्यात आली. कार्यकारी अभियंता पॉल फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिघाड शोधण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. उच्च दाबाची वीज वापरणारी हॉटेल्स तसेच अन्य आस्थापनांना वीज मिळू शकली नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत. पणजीतील वीज २0 मिनिटांत पूर्ववत झाली. वीज नाही म्हणून पाणी नाही, अशीही स्थिती उद्भवल्याने लोकांचे पाण्याअभावी हाल झाले. राजधानी शहरात व्यापारी आस्थापनांनाही फटका बसला. रात्री ८ वाजता शहरातील वीज गुल झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. रविवार असल्याने अनेक दुकाने बंद होती. (प्रतिनिधी)