शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मागणे हा गुन्हा नव्हे: दिलीप परुळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:30 IST

बुथवरील साध्या कार्यकर्त्याला उद्या निवडणूक लढवावीशी वाटली तर त्यात काहीच गैर नाही', असे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साळगावचे माजी आमदार तथा माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी लोकसभेच्या तिकिटाबद्दल पुन्हा एकदा दावा करताना 'पक्षाकडे तिकीट मागणे हा गुन्हा नव्हे. बुथवरील साध्या कार्यकर्त्याला उद्या निवडणूक लढवावीशी वाटली तर त्यात काहीच गैर नाही', असे म्हटले आहे.

तिकिटावरील आपल्या दाव्याचे समर्थन करताना परुळेकर यांनी पुढे असाही पुनरुच्चार केला की, पक्ष जर श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देत नसेल तर ती मलाच मिळायला हवी. श्रीपाद यांना पक्षाने बाजूला काढल्यास तिकिटावर माझाच हक्क पोहोचतो, कारण पक्षात मी ज्येष्ठ आहे. १९९९च्या आधीपासून मी पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले. मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी हाताळली. पक्षाने मला आमदार, मंत्री बनवले. पक्षाने सदस्य मोहीम राबवली, त्याचा मी प्रमुख होतो.

गोव्यात ४ लाख ७० हजार सदस्य केले. तसेच माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या षठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा संपूर्ण राज्यात मी फिरून बैठका घेतल्या होत्या. उत्तर गोव्यातच नव्हे तर संपूर्ण गोवाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात मी आहे. सध्या आमदार नसलो तरी मी माझे काम चालूच ठेवले आहे. उपाध्यक्ष म्हणून तसेच पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली असल्याचे परुळेकर म्हणाले.

अजून काहीजण रांगेत...

श्रीपाद नाईक यांना वयस्कर संबोधून विश्रांतीचा सल्ला देणे योग्य नव्हे. भाजपात राष्ट्रीय स्तरावर तसेच गोव्यातही त्यांच्यापेक्षा वयस्कर नेते आहेत. श्रीपादभाऊंनी इच्छुकांना 'नवरे' संर्बोधले यातही मला त्यांची काही चूक वाटत नाही, लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. येत्या एप्रिल-मे पर्यंत ती होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीही तिकिटोच्छुक पुढे येतील, असेही परुळेकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाBJPभाजपा