गोमेकॉतून डॉक्टर बनलेल्यांना सक्तीची सेवा तीन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:17 IST2018-04-12T22:17:10+5:302018-04-12T22:17:10+5:30

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर  शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडणाºया नव डॉक्टरना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील

Three years of forced service to Gomacko doctors | गोमेकॉतून डॉक्टर बनलेल्यांना सक्तीची सेवा तीन वर्षे

गोमेकॉतून डॉक्टर बनलेल्यांना सक्तीची सेवा तीन वर्षे

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर  शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडणाºया नव डॉक्टरना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील सरकारी इस्पितळातील सक्तीच्या सेवेची मूदत वाढवून तीन वर्षे केली आहे. तसे हमीपत्रे त्यांच्याकडून घेण्यात आली आहेत. 

कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठराविक काळ या डॉक्टरना सरकारी इस्पितळात किमान ठराविक कालावधीसाठी  सेवा देणे सक्तीचे असते. किती काळ सेवा ही त्या त्या  ठिकाणच्या महाविद्यालयांवर अवलंबून असते.  एमबीबीएस पूर्ण करून पुढे पदव्युत्तर  शिक्षण घेणाºयांंना ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सेवा द्यावी लागते. गोमेकॉही त्याला अपवाद नाही. तसे हमीपत्र सुरुवातीलाच त्यांच्याकडून घेतले जाते. त्या शिवाय त्यांना डीग्री दिली जात नाही राज्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रे, परिवार आरोग्य केंद्रे, शहर आरोग्य केंद्रे, जिल्हा इस्पितळे अशा ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाते. डॉक्टर म्हणून बाहेर पडण्यपूर्वी अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव मिळावा आणि ज्या राज्याने या मुलांना डॉक्टर बनविले त्यांना त्या राज्याप्रती कृतज्ञता म्हणून ही सेवा द्यावी असा त्याचा उद्देश असतो.  गोमेकॉत हा कालावधी एक वर्षाचा होता. आता तो वाढवून तीन वर्षे करण्यात आल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली. 
सक्तीच्या सेवेची मूदत वाढविण्यात आल्यामुळे विद्यार्थी नाराज असून ही वाढीव सक्ती कमी करून घेण्यासाठी ते विविध माद्यमातून प्रयत्नशीलही आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्त शिक्षण घेऊन कुठे तरी मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी जाण्याची इच्छा असते. काही जण विदेशातही जाण्याची तयारी करत असतात. त्यामुळेच हा नाराजीचा सूर आहे. वास्तविक एक वर्षांच्या सक्तीतूनही अनेक जण वेगळा मार्ग काढून सक्तीच्या सेवेपासून मुक्ती मिळविण्याच्या धडपडीत असतात. त्यामुळे ही वाढीव सक्ती अशा विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक वाटणार हेही निश्चीत.

Web Title: Three years of forced service to Gomacko doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.