शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 21:08 IST

वर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मडगाव: वर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आज या संशयिताला मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, त्या बालिकेच्या पालकांचा शोध लागला असला तरी ते पालक त्या मुलीच्या संगोपनासाठी तेवढे सक्षम नसल्याने अजूनही त्या बालिकेचा ताबा पालकांकडे देण्यात आलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे कोकण रेल्वे पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे पत्रव्यवहार केला असून, त्यात भोपाळहून त्या बालिकेला गोव्यात आणले तर तिचे पालनपोषणची जबाबदारी समिती पेलू शकणार का याबाबत विचारणा केली आहे.मागच्या 9 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील मंगळुरु येथे रिझवान कालू इंदू याला तेथील पोलिसांनी अटक केली होती. मागाहून कोकण रेल्वे पोलिसांनी मंगळुरू येथे जाउन संशयिताला ताब्यात घेऊन नंतर रितसर अटकही केली होती. 25 सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्या बालिकेच्या पालकांचाही शोध लावण्यास यश मिळविले होते. 1 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून त्या तीन वर्षीय बालिकेचे अज्ञाताने अपहरण केले होते.ती बालिका आपल्या पालकांसमवेत प्लॅटफॉर्मवर झोपली असता, तिचे अपहरण करण्यात आले होते. मूळ हुबळी येथील हे कुटुंब मडगावात कामानिमित्त आले होते. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात त्या मुलीचे अपहरण करतानाचं चित्र कैद झालं होतं. पहाटे आपली मुलगी दिसेनासी झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला होता. मागाहून या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंविच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-यावरील फुटेजच्या आधारे त्या बालिकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईलाही पथक रवाना करण्यात आले होते. मुंबईतल्या श्रीछत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर अपहरणकर्ता रेल्वे स्थानकावरून बाहेर जाताना तेथील सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये टिपला गेला होता. मुंबईला गेलेल्या पोलिसांना संशयित मात्र सापडू शकला नव्हता. त्यानंतरही अनेकदा पोलीस पथक मुंबई तसेच शेजारच्या राज्यात पाठवून देण्यात आले होते.

टॅग्स :jailतुरुंगgoaगोवा