शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर गोव्यात दोन दिवसात तीन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 20:26 IST

उत्तर गोव्यातील कळंगुट तसेच हणजूण या दोन जगप्रसिद्ध किनारी भागात दोन दिवसांत तीन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली तर यात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली आहे. त्यात दोन रशियन युवतींचा देखील समावेश आहे.

म्हापसा : उत्तर गोव्यातील कळंगुट तसेच हणजूण या दोन जगप्रसिद्ध किनारी भागात दोन दिवसांत तीन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली तर यात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली आहे. त्यात दोन रशियन युवतींचा देखील समावेश आहे.बुधवारी (२२ रोजी) कळंगुट पोलिसांनी येथील एका तारांकीत हॉटेलवर धाड घालून केलेल्या कारवाईत दोन दलालांना अटक केली. तर एका मुलीची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट भागातील एका हॉटेलमध्ये युवतींना वेश्या व्यवसायासाठी पुरवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गुप्त माहिती गोळा करुन हॉटेलवर छापा टाकण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.पथकात दळवी यांच्या सोबत उपनिरीक्षक विदेश पिळगावकर, सीताराम मळीक, महिला उपनिरीक्षक करिष्मा परुळेकर, हवालदार सुभाष मालवणकर, विद्यानंद आमोणकर तसेच बिगर सरकारी संघटनेच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. तयार केलेल्या पथकांनी साध्या वेषात सदर हॉटेल बाहेर कारवाई करण्याची तयारी सुरु केली.त्याच दरम्यान एक व्यक्ती दुचाकीवरुन हॉटेलच्या परिसरात आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हॉटेलात वेश्या व्यवसायासाठी पुरवण्यात आलेल्या युवतीला नेण्यासाठी आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. लगेच त्या हॉटेलच्या खोलीवर छापा मारण्यात आला. त्यावेळी खोलीत असलेल्या त्या युवतीची सुटका करण्यात आली. तर त्या युवतीसोबत खोलीत असलेल्या चंदन कुमार (३७, गोरेगाव-मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले. त्या युवतीला १२ हजाराच्या बोलीवर आपण आणल्याचे चंदन कुमार यांनी पोलिसांना सांगितले.युवतीचा पुरवठा करणारा दलाल रेहन अब्दुल कुरेशी (पालघर मुंबई) याला पोलिसांनी ग्राहक चंदन कुमार याच्या सोबत अटक केली आहे. या छाप्या दरम्यान पोलिसांनी ४ मोबाईल फोन तसेच ५५ हजार रुपयांची रोकड ग्राहक व दलालाकडून ताब्यात घेतली आहे. तसेच युवतीचा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. छापासत्र संपल्यानंतर सदर तारांकीत हॉटेलची तसेच तेथील नोंदवहीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हॉटेलला सिल ठोकण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चंदनकुमारने हॉटेलमध्ये प्रवेश करतेवेळी स्वत:चे ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रे दिली नसल्याचे आढळून आले आहे. सुटका केलेल्या युवतीची पणजी जवळ असलेल्या मेरशी येथील अपनाघरात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे.दोन दिवसापूर्वी हणजूण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून रशियन युवतींसह चार युवतींची सुटका केली होती. तसेच चार दलालांनाही अटक केली होती. मागील दोन दिवसात किनारी भागातील पोलिसांनी करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे.दरम्यान व्हीसाची मुदत संपूनही देशात वास्तव्य करून असलेल्या कझाकिस्तान देशाच्या एका महिला नागरिकाला कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. नायला पिल्टस् ३५ वर्षिय महिला बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. मागील दोन वर्षांपासून ती कळंगुट परिसरात राहत होती. अटक करून महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा