शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तीन महिन्यांचे वीज बिल २८५ कोटी

By admin | Updated: July 28, 2014 02:20 IST

सरकारची धावपळ : मदार पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन आणि खासगी कंपन्यांवर

पणजी : विजेच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण नसल्याने आर्थिक भार सरकारवर पडत आहे. मार्चमध्ये अचानक वीज तुटवडा निर्माण झाल्याने पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन तसेच टाटा आदी कंपन्यांकडून जादा दराने वीज खरेदी करावी लागली असून त्यावर गेल्या तीन महिन्यांत एकूण २८५ कोटी रुपये बाहेर काढावे लागले आहेत. मार्चपासून तीन महिने राज्याला वीज कमी मिळाली. ४५0 मॅगावॅटपेक्षा जास्त गरज असताना केवळ ३२0 मॅगावॅटपर्यंत पुरवठा खाली आल्याने सरकारची धावपळ उडाली व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करावी लागली. एप्रिलमध्ये वीज खरेदीवर ८७ कोटी, मेमध्ये ९५ कोटी, तर जूनमध्ये १0३ कोटी रुपये सरकारला बाहेर काढावे लागले. गोव्यासाठी छत्तीसगढचा कोळसा आधारित प्रकल्प हाच आता आशेचा किरण ठरला आहे. या प्रकल्पावर सरकारने आतापर्यंत ६00 ते १000 कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सीआयडी पोलिसांत तक्रार दाखल झालेली आहे. विधानसभेतही आमदार रोहन खंवटे यांनी त्याबाबत आवाज उठविला आहे, त्यामुळे गोमंतकीयांसाठी विजेसाठी आशेचा किरण असलेल्या या प्रकल्पाच्या बाबतीतही आता साशंकता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून परवाने मिळालेले असले तरी या कोळसा ब्लॉकला छत्तीसगढ प्रशासनाने लिज परवाने दिलेले नाहीत. राज्याची विजेची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २0१६ पर्यंत विजेची गरज ८00 मॅगावॅटपर्यंत वाढणार आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात दरवर्षी २६ लाख देशी, तसेच सात-आठ लाख विदेशी पर्यटक भेट देतात. सुशीलकुमार शिंदे वीजमंत्री असताना त्यांनी म्हादई खोऱ्यात सहा छोटे छोटे जलविद्युत प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती; परंतु ही घोषणाही हवेतच विरली. रिलायन्स कंपनीकडील वीज खरेदी करार येत्या १४ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर या कंपनीकडील करार चालू ठेवण्याची शक्यता कमी आहे. (प्रतिनिधी)