तीन मंत्र्यांचे उत्पन्न चक्क ५ लाखांहून कमी!

By Admin | Updated: November 5, 2015 02:15 IST2015-11-05T02:14:59+5:302015-11-05T02:15:25+5:30

आमदार, मंत्री म्हटला की, त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे मोठमोठे आकडे डोळ्यांसमोर येतात. मात्र, बार्देस तालुक्यातील तीन बड्या मंत्र्यांबाबत उलट घडले आहे.

Three ministers less than 5 lakhs! | तीन मंत्र्यांचे उत्पन्न चक्क ५ लाखांहून कमी!

तीन मंत्र्यांचे उत्पन्न चक्क ५ लाखांहून कमी!


प्रसाद म्हांबरे ल्ल म्हापसा
आमदार, मंत्री म्हटला की, त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे मोठमोठे आकडे डोळ्यांसमोर येतात. मात्र, बार्देस तालुक्यातील तीन बड्या मंत्र्यांबाबत उलट घडले आहे. या मंत्र्यांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांची नावे वार्षिक ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटात समाविष्ट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, कला व जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा यादीत समावेश आहे. तशी माहिती खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांहून कमी आहे, असे दारिद्र्यरेषेवरील कार्डांसाठी अर्ज करताना लिहून द्यावे लागते. या तिन्ही मंत्र्यांच्या नावापुढे ‘कुटुंब प्रमुख’ अशी नोंद करत त्यांच्या नावे कार्डे वितरित केली आहेत.
केंद्र सरकारने लागू केलेल्या अन्न सुरक्षा कायद्याची राज्यात अंमलबजावणी करताना नवीन डिजिटलाइज्ड रेशन कार्डे वितरित करण्याची प्रक्रिया नागरी पुरवठा खात्याने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आपला परिवार दारिद्र्यरेषेवरील असला, तरी वार्षिक उत्पन्न मात्र रुपये ५ लाखांहून कमी असल्याचे सांगणाऱ्यांत या मंत्र्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
इतर सर्व कार्डधारकांत नियमानुसार कुटुंब प्रमुख म्हणून पत्नी किंवा घरातील वयस्कर महिलेचे नाव देण्यात आले आहे. (पान २ वर)

Web Title: Three ministers less than 5 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.