वार्कात झाडाला लटकलेले तीन मृतदेह
By Admin | Updated: December 28, 2015 01:32 IST2015-12-28T01:32:31+5:302015-12-28T01:32:51+5:30
वार्कात झाडाला लटकलेले तीन मृतदेह

वार्कात झाडाला लटकलेले तीन मृतदेह
मडगाव : वार्का समुद्रकिनाऱ्यावर एका झुडपामध्ये तिघा जणांचे झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह सापडले. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला व एका युवकाचा समावेश आहे. त्यांची ओळख पटू शकली नाही. एकाच झाडावर मृतदेह लटकताना बघून पोलीसही चक्रावले. मृतांमधील महिला व युवकाने एकाच साडीने गळाफास लावून घेतला आहे तर पुरुषाने दोन लुंगींच्या साहाय्याने गळ्याभोवती फास आवळला होता. तुर्त कोलवा पोलिसांनी आत्महत्येची घटना म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कोलवा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांना घटनास्थळी एका टूर अॅण्ड ट्रॅव्हर्ल्सचे तिकीट मिळाले असून, त्यात बंगळुरू असा पत्ता आहे. त्यामुळे मृत व्यक्ती या कर्नाटकातील असाव्यात व त्या गोव्यात सहलीसाठी आल्या असाव्यात, असा संशय आहे. मृत व्यक्ती या एका घरातील असाव्यात, असाही पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आई-वडील आणि मुलगा असावेत, असाही अंदाजच आहे. मात्र, नेमके काहीही कळालेले नाही.
पुरुष साधारणत: ६0 वयोगटातील असून, महिला ५0 ते ६0 तर युवक हा पंचवीस ते तीस वयोगटातील आहे. घटनास्थळी मिळालेल्या तिकिटावर मंजूनाथ असे नाव असून, २४ डिसेंबरला (पान २ वर)