वांते-सत्तरीत वादळी वाऱ्याने लाखोंची हानी
By Admin | Updated: September 29, 2014 17:08 IST2014-09-29T17:08:32+5:302014-09-29T17:08:59+5:30
होंडा : वांते-अडवई भागात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील छप्परे उडाली, तर काही ठिकाणी घरावर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

वांते-सत्तरीत वादळी वाऱ्याने लाखोंची हानी
होंडा : वांते-अडवई भागात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील छप्परे उडाली, तर काही ठिकाणी घरावर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
परवळ भागात राहणाऱ्या जोशी यांच्या वरच्या मजल्यावरील पत्र्याचे छप्पर पूर्णपणे उडून गेल्याने त्यांचे दोन लाखांचे नुकसान झाले. जोशी यांनी सांगितले की दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने घराचे छप्पर उडून गेले, तर बागायतीमधील माड, आंबा, सागवान, फणस व चिंचेची झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. मड्डीवाडा वांते येथील वसंत नारायण गावडे यांच्या घरावरील लोखंडी पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांना सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले. तेथील विष्णू रामा गावडे यांच्या घरावर झाड कोसळून त्यांचे ६० हजारांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे चंद्रकांत बाबली गावडे यांच्या घराचे काही पत्रे उडून गेले. पंच नितीन शिवडेकर यांनी अग्निशामक दलाला पाचारण करून रस्त्यावर व घरावर पडलेली झाडे हटवली. (वार्ताहर)
आणखी वृत्त/२