‘त्या’ अपंग कर्मचाऱ्यास सरकारकडून न्याय
By Admin | Updated: December 10, 2015 01:53 IST2015-12-10T01:52:56+5:302015-12-10T01:53:05+5:30
पणजी : मोर्ले-सत्तरी येथे राहणाऱ्या रामकृष्ण गावस या सरकारच्या क्राफ्टमॅन ट्रेनिंग खात्याच्या अपंग कर्मचाऱ्याची पणजीहून

‘त्या’ अपंग कर्मचाऱ्यास सरकारकडून न्याय
पणजी : मोर्ले-सत्तरी येथे राहणाऱ्या रामकृष्ण गावस या सरकारच्या क्राफ्टमॅन ट्रेनिंग खात्याच्या अपंग कर्मचाऱ्याची पणजीहून वास्कोतील आयटीआयमध्ये ६६ किलोमीटर अंतरावर बदली करण्यात आल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले व या खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी या वृत्ताची दखल घेऊन ही बदली येत्या ४८ तासांत रद्द करण्याची सूचना खात्याच्या संचालकांना केली.
रामकृष्ण गावस हा कर्मचारी ४२ टक्के पायाने अपंग आहे. आपल्याला चार बसगाड्या बदलून सत्तरीहून वास्कोत जावे लागते. सायंकाळी सातनंतर साखळीहून आपल्या गावात येण्यासाठी बसची व्यवस्थाही नसते, असे गावस याचे म्हणणे होते.
(खास प्रतिनिधी)