तिसरी आघाडी २६ जानेवारीपर्यंत
By Admin | Updated: November 24, 2015 01:31 IST2015-11-24T01:31:11+5:302015-11-24T01:31:22+5:30
पणजी : तिन्ही अपक्ष आमदारांनी एकसंध असल्याचे स्पष्ट करीत येत्या २६ जानेवारीपर्यंत तिसरी आघाडी स्थापन केली

तिसरी आघाडी २६ जानेवारीपर्यंत
पणजी : तिन्ही अपक्ष आमदारांनी एकसंध असल्याचे स्पष्ट करीत येत्या २६ जानेवारीपर्यंत तिसरी आघाडी स्थापन केली जाईल, असे संकेत दिले आहेत. २0१७च्या विधानसभा निवडणुकीत त्यामुळे नवीन शक्ती उदयास आलेली दिसेल आमदार सरदेसाई म्हणाले की, आम्ही तिघेही एकत्र आहोत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रत्येक बाबतीत बोटचेपे धोरण अवलंबिले आहे. फा. बिस्मार्कसाठी न्याय मागण्यासाठी शांतपणे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत माजवली जाते. इफ्फीत फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन संस्थेच्या विद्यार्थ्यांचा छळवाद सुरू आहे. राज्यात आणीबाणीसारखी स्थिती असूनही काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या सुरात सूर मिसळून आहे त्यामुळे आम्हा तिन्ही अपक्ष आमदारांना विरोधकांचा आवाज बनावे लागले आहे. याप्रसंगी अपक्ष आमदार रोहन खंवटे, तसेच आमदार नरेश सावळ हेही उपस्थित होते. खंवटे म्हणाले, फादर बिस्मार्क यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पोलीस बळाचा वापर करून दंडेलशाही दाखवली जाते. तेथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांचीही तमा बाळगली जात नाही, हे दुर्दैवी आहे.
(प्रतिनिधी)